ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर अडचणीत, चार फ्लॅट ताब्यात घेण्याचे मुंबई महापालिकेला आदेश

0

मुंबईः मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Shivsena Thackeray Camp leader Kishori Pednekar in Trouble) चार सदनिकांवरून अडचणीत आल्या आहेत. एसआरएने त्यांना दणका देत वरळीतील चार सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत. पेडणेकर यांच्यासाठी हा मोठाच धक्का मानला जात आहे. किशोरी पेडणेकर यांनी त्यांची कंपनी कीश कॉर्पोरेशनच्या माध्यमातून वरळी गोमाता जनता एसआरए प्रकल्पातील 4 सदनिका बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतल्या होत्या, अशी तक्रार भाजप नेते किरीट सोमय्यांनी केली होती. एसआरएने सोमय्यांची ही तक्रार स्वीकारत हे चार गाळे ताब्यात घेत असल्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
सोमय्या यांनी पेडणेकर यांच्या चार सदनिकांविषयी एसआरएकडे तक्रार केली होती. पेडणेकर यांनी या सदनिका बळकावल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.

त्यांच्या बेनामी सदनिकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर एसआरएने महापालिकेला हे आदेश दिले आहेत.एसआरए अधिकार्‍यांनी किशोरी पेडणेकर, किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस आणि बेनामी सहकारी विरुद्ध कलम 3ए अंतर्गत या सदनिकांचे निष्कासन करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील 4 दिवसांत मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी हे गाळे रिकामे करून एसआरएच्या ताब्यात देतील, असे किरीट सोमय्यांनी यांनी सांगितले. दरम्यान, किशोर पेडणेकर या ठाकरे गटाच्या वरीष्ठ नेत्या आहेत. त्या मुंबईच्या महापौर राहिलेल्या आहेत. या कारवाईनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट, भाजप यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

फिश आणि चिप्स, टमाटर सॉस आणि बरितो| Fish,Chips,Tomato Sauce & Burrito Recipe |Epi 36|Shankhnaad News

https://www.youtube.com/watch?v=F5ze5Xhxo7o
    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा