मुंबईः अडीच वर्षे महाविकास आघाडी व उद्धव ठाकरे सरकारच्या काळात सरकारच्या काळात महाराष्ट्र विकासात मागे पडला. त्या काळात शासनाच्या विभागाने केलेल्या कामावर श्वेतपत्रिका काढल्यास सत्य परिस्थिती समोर येईल व त्या काळच्या सत्ताधाऱ्यांना पळता भूई कमी पडेल, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrashekhar Bawankule) यांनी केला. बावनकुळे म्हणाले, राज्यातील महत्वाच्या प्रश्नावर विरोधी पक्षांनी काम करायचे असते. मात्र विरोधक सारे विषय बाजूला सारून विनाकारणचे वाद बाहेर काढत आहेत. राज्यात अनेक प्रश्न आहेत. मागील अडीच वर्षांत वीज, उद्योग, सिंचन, पीक विमा यात मागे गेला आहे. त्याची विषयावर चौकशी करण्याची मागणी केली आहे व विधान परिषदेतही हा प्रश्न लावून धरणार आहे. मात्र विरोधक उगीच कोणत्याही विषयावर राजकारण करीत आहेत. शिवाजी महाराज हे आम्हा सर्वांचे आदर्श आहेत व राहतील, त्यांच्या इतिहासाला हात लावण्याची हिमंत कुणातही नाही व यानतरही हजारो वर्ष तशी हिंमत कुणी करणार नाही. त्यावर राजकारण करू नये व संवेदनशीलपणे भूमिका मांडवी असे आवाहन त्यांनी केले.
देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना विरोधक यापेक्षाही वाईट पद्धतीने टीका करीत होते. खरे पाहता उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षे कार्यकाळात औरंगेजेबाप्रमाणे हुकुमशाही पद्धतीने सरकार चालविले. आमदारांच्या एकाही पत्रावर स्वाक्षरी केली नाही. म्हणूनच आमदारांनी योग्य वेळी योग्य भूमिका घेतली. इतिहासाचे दाखले देऊन एखाद्या गोष्टीचे वर्णन केले जाते. दाखले देण्यात कुणाची चूक झाली असेल तर ती मान्य करता येईल असेही यावेळी बावनकुळे म्हणाले.
१८ लोकसभा क्षेत्रात प्रवास योजना
राज्यातील ४८ लोकसभा व २८८ विधानसभा मतदार संघात संघटन मजबुत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगून बावनकुळे म्हणाले, बुथ स्तरावर दररोज कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. सरकारकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्या संघटनेच्या माध्यमातून सरकारकडे पाठवित आहे. शिंदे-फडणवीस सरकारचे हे काम करू शकते असे वाटत आहे. प्रत्येक जिल्ह्याचा विकासाचा रोडमॅप सरकारकडे देत आहोत. १८ लोकसभा क्षेत्रात राज्याने लोकसभा प्रवास योजना सुरू केली आहे. अकोला अमरावती वर्धा, रामटेक, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ या लोकसभेसाठी नितीनजी गडकरी, ठाणे आणि उत्तर पश्चिम मुंबई साठी पियुष गोयल, सांगली साठी नारायण राणे, लातूर व मावळ साठी रावसाहेब दानवे , परभणी व धुळे साठी- भागवत कराड, नाशिकसाठी डॉ. भारती पवार, तर रावेर व सोलापूर लोकसभा मतदास संघासाठी कपील पाटील हे प्रभारी मंत्री असतील.
सीमाप्रश्नावर सुप्रीम कोर्टच निर्णय घेणार
महाराष्ट्र व कनार्टक सीमाप्रश्नावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यावर कनार्टकातील किंवा महाराष्ट्रातील जनता काहीच करू शकत नाही. महाराष्ट्राची टाचणीभर जागा कनार्टकाला मिळणार नाही यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस सक्षम असल्याचे श्री बावनकुळे म्हणाले.
ठाकरे सरकारच्या कार्यकाळाची श्वेतपत्रिका काढावी-चंद्रशेखर बावनकुळे
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा