भारत देश विकासाच्या बाबतीत कितीही प्रगतशील होत असला तरी देखील देशाचा किन्नर समुदायाचा तबका नेहमी उपेक्षित समजला जात असतो , आज देखील या समुदायाला समाजात मानाचे स्थान नाही किंवा यांना देशातील शिक्षित वर्ग देखील आपल्यामध्ये सामावून घ्यायला तयार नाही अशा वर्गासाठी सामाजिक दायित्व म्हणून आज एचसीजी एनसीएचआरआय रुग्णालयाच्या वतीने कर्करोग तपासणी शिबिराच आयोजन करण्यात आले , ट्रान्सजेंडर , एलजीबीटी , ट्रांसवुमन यांच्या मध्ये स्तन कॅन्सर च प्रमाण सातत्याने वाढत आहे , मात्र या वर्गामध्ये कर्करोगाविषयी जनजागृती चा बराच अभाव आहे त्यामुळे या समुदायात देखील जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा कर्करोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आला.
या कर्करोग तपासणी शिबीर दरम्यान सैकडो किन्नर , एलजीबीटी आणि ट्रान्सजेंडर्सनी रुग्णालयात पोहचून स्वतःची तपासणी करून घेतली , अशा प्रकारच्या शिबिराच संपूर्ण देशात आयोजन केलं जावं अशी आशा देखील या समुदायाने या प्रसंगी व्यक्त केली ,