‘द काश्मीर फाईल्स’ भाजपचा चित्रपट-संजय राऊत

0

मुंबई : देशभर गाजलेला ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट वादग्रस्त ठरविण्याचा प्रयत्न गोव्यातील इफ्फी या चित्रपट महोत्सवातही झाला असताना आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही विरोधकांच्या सुरात सूर मिळत हा चित्रपट भाजपने बनविला असल्याचा आरोप केला आहे. चित्रपट महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी महोत्सवाचे परिक्षक नदाव लॅपिड यांनी काश्मीर फाईल्स हा प्रोपगंडा करणारा आणि अश्लील चित्रपट असल्याचा धक्कादायक दावा केला होता. आता त्यावरुन पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली असताना संजय राऊत यांनीही टीका केली आहे.

(Sanjay Raut Comment on the kashmir files) लॅपिड यांच्या वक्तव्याचे सोशल मीडियावर चांगलेच पडसाद उमटले असून त्यावर आतापर्यत दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, चित्रपटाचे निर्माते अनिल पंडित, प्रमुख कलाकार अनुमप खेर यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सत्य हे नेहमीच कटू असते. खोटेपणाला कितीही मोठी उंची दिली तरी ते सत्यापुढे छोटेच असते. अशा आशयाच्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत. काश्मीर फाईल्स हा २०२२ मधील सर्वात गाजलेला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटानं सर्वाधिक चर्चेत राहण्याची कामगिरी करुन दाखवली आहे. देशातील काही कथित धर्मनिरपेक्षतावादी तसेच डाव्या विचारसरणीच्या समीक्षकांनी काश्मीर फाईल हा सत्यावर आधारित चित्रपट नसल्याचा प्रचार सातत्याने राबविला आहे. आता त्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आपला सूर मिसळला आहे. आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. “लॅपिड जे म्हणाले ते काही खोटे नाही. तो तसाच चित्रपट आहे. ‘काश्मीर फाईल्स’ हा भाजपचा प्रचार करणारा चित्रपट आहे” असे राऊत म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा