धक्कादायक…तुम्ही हेडफोन्स, इयरबड्स वापरताय, हा धोका लक्षात घ्या…

0

जगभरात सुमारे एक अब्ज किशोरवयीन, तरुणांमध्ये श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका
नवी दिल्ली: किशोरवयीन किंवा तरुणपीढीकडून सध्या हेडफोन, इअरबड्सचा वापर प्रचंड प्रमाणात होत आहे. मात्र, ऐकण्याच्या सोयीसाठी वापरल्या जाणाऱ्या या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचे दुष्परिणाम आरोग्यावर होत असून यासंदर्भातील एक धक्कादायक अहवाल बीएमजे ग्लोबल हेल्थ या जागतिक ख्यातीच्या नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. हेडफोन्स आणि इयबड्समुळे जगभरात सुमारे एक अब्ज किशोवयीन व तरुण मुलांची श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका, जोखिम संभावते, अशी भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे (Potentially At Risk of Hearing Loss). विविध देशांची सरकारे, उद्योग जगत व सिव्हील सोसायटीने याकडे तातडीने लक्ष देऊन ऐकण्याच्या सुरक्षित पद्धतींचा पुरस्कार करण्याची गरज असल्याचे संसोधकांनी नमूद केले आहे.


बीएमजे ग्लोबल हेल्थ नियतकालिकातून या लेखात नमूद केलेल्या पाहणीत १२ ते ३४ वर्षे वयोगटातील मुले, युवकांचा समावेश करण्यात आला होता. गाणी ऐकण्यासाठी, फोनवर बोलण्यासाठी किंवा अन्य कारणांपायी हेडफोन्स व इयरबड्सचा वापर तासनतास केला जातो. मात्र, सतत मोठ्या आवाजात गोष्टी ऐकत राहिल्याने तुमच्या श्रवणशक्तीवर त्याचा गंभीर परिणाम असल्याचे या अभ्यासात आढळून आले आहे. यामुळे बहिरेपणा येण्याचा धोका वाढतो आहे. हेडफोन, इयरबड्सचा वापर करणारे किशोरवयीन किंवा तरुण ध्वनीची पातळी १०५ डेसिबलपेक्षा अधिक ठेवून कार्यक्रम, गाणी ऐकतात. कुठल्याही गाण्याच्या आवाजाची पातळी १०४ ते ११२ डेसिबलच्या दरम्यान असते. प्रौढांनी ८० डेलिबल व लहान मुलांनी ७५ डेलिबलच्या आतच गाणी ऐकायला हवीत. अन्यथा कमी वयातच बहिरेपणाचा त्रास जाणवू शकतो. ही मर्यादा सध्या सहज ओलांडली जातेय, असे अहवालात नमूद करण्यात आलेय.