धवनकरांना निलंबित करा, एसआयटी नेमा

0

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची मागणी: खंडणी वसुली प्रकरणाची गंभीर दखल


नागपूर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) गाजत असलेल्या खंडणीखोरी प्रकरणाची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Deputy Speaker of Legislative Council Dr. Neelam Gorhe) यांनी गंभीर दखल घेतली आहे. गंभीर आरोप असणारे धर्मेश धवनकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करून सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी गोऱ्हे यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Dada Patil) यांच्याकडे केली आहे. याविषयावर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जनसंवाद विभागाचे सहाय्यक प्राध्यापक धर्मेश धवनकर यांनी विद्यापीठातील तास विभागप्रमुखांना ‘तुमच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार आली आहे’, अशी खोटी बतावणी करीत भीती दाखवून 15.50 लाखांची खंडणी उकळली. फसवणूक झालेल्या सर्व सातही विभागप्रमुखांनी लेखी तक्रार केली आहे. या गंभीर प्रकरणात रोजच नवीन खुलासे होत आहे. या प्रकरणात होणाऱ्या कारवाईकडे राज्यातील शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणात धवनकर यांना निलंबित करण्याची मागणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदनातून केली आहे.

तक्रारकर्तेही संशयाच्या भोवऱ्यात


निवेदनात गोऱ्हे यांनी फसवणूक व खंडणी उकळल्याची तक्रार करणाऱ्या विभागप्रमुखांबाबतही शंका उपस्थित केली आहे. त्या म्हणतात की, या सातही विभागप्रमुखांनी काही चूक केली नव्हती, तर त्यांनी असे भीतीपायी लाखो रुपये का दिले, असाही प्रश्न उपस्थित होतो. ते खंडणी मागणाऱ्या धवनकर यांना न घाबरता पोलिसांकडे तक्रार करू शकले असते. मात्र, त्यांनी घाबरून खंडणी का दिली, याचाही विचार होणे गरजेचा आहे. या प्रकरणी सखोल तपास होणे गरजेचे आहे. या पूर्वीही नागपूर विद्यापीठामध्ये काही मुलींचे शोषण होऊन पैसे वसूल करून प्रकरण दडपले गेले का, याचा तपास केला जावा, अशी त्यांची मागणी आहे.

*फिश आणि चिप्स, टमाटर सॉस आणि बरितो रेसिपी | How to make Fish & Chips Recipe| Epi 25| Shankhnaad News*