नराधम आफताबची आज नार्को चाचणी, श्रद्धा वालकर हत्याकांड

0

नवी दिल्ली: देशभर गाजत असलेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी नराधम आफताबविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलीस आज आरोपी आफताबची नार्को टेस्ट करणार आहेत (Narco Test of Aftab in Shraddha Walkar Case). दिल्लीतील आंबेडकर रुग्णालयात ही चाचणी होणार असून यासाठी दिल्ली पोलिसांनी 50 प्रश्नांची यादी तयार केली आहे. आफताब हा सातत्याने पोलिसांची दिशाभूल करीत असल्याने पोलिसांनी त्यांच्या नार्को चाचणीची परवानगी मागितली होती. दरम्यान, या चाचणीच्या वेळी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) ची चमू देखील उपस्थित राहणार आहे. दरम्यान, श्रद्धाच्या पार्थिवाचे अनेक अवशेष पोलिसांना सापडले असले तरी डोक्याचा भाग अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे पोलिस छतरपूर जिल्ह्यातील मैदान गढी येथे पोहोचले असून त्यांनी तेथे तलाव रिकामा करण्याचे काम सुरू केले. या तलावातच श्रद्धाचे डोके फेकल्याची कबुली आफताबने दिली आहे.
दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत छतरपूर जिल्ह्यातील मेहरौली जंगलातून कवटी आणि काही हाडे जप्त केली आहे. आतापर्यंत 17 हाडे सापडली असून, ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.

ते सीसीटीव्ही फुटेज

दरम्यान, श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी नराधम आफताब हा बॅग घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहेत. हे फुटेज १८ ऑक्टोबरचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पहाटे चार वाजता तो हातात बॅग घेऊन जाताना दिसत असून त्यात मृतदेहाचे तुकडे असावे, असा पोलिसांना यश आले. दिल्ली पोलिसांनी आफताबच्या मेहरौलीतील फ्लॅटमधून सर्व कपडे जप्त केले आहेत. यामध्ये श्रद्धाच्या कपड्यांचाही समावेश आहे.

आफताबचे कुटुंब बेपत्ता
दरम्यान, या प्रकरणात आफताबचे कुटुंब अद्याप बेपत्ता असून पोलिसांना अद्यापही त्यांच्याशी संपर्क साधता आलेला नाही. त्याचे कुटुंब पालघर जिल्ह्यातील वसई येथील युनिक पार्क हाऊसिंग सोसायटीत भाड्याने राहात होते. येथे आरोपी आफताब त्याच्या कुटुंबासह राहत त्याच्या कुटुंबीयांनी 20 दिवसांपूर्वी घर सोडले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. आफताबचे कुटुंबीय कुठे गेले याची माहिती नसल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा