एअर फेस्ट’ने जिंकली नागपुरकरांची मने

0

नागपूरकरांनी विमानांच्या अनुभवल्या चित्तथरारक कवाती

नागपूरच्या आकाशात वायुदलाच्या चित्त थरारक कसरती नागपूरकरांना अनुभवायला मिळाल्या. ( Amrit Mahotsav of Freedom ) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शोमध्ये सूर्यकिरण एरोबॅटीक आणि सारंग हेलिकॉप्टरच्या नमुने केलेल्या हवाई कसरतीने ( nagpur ) नागपूरकरांच्या डोळ्यांचे जणू पारणेच फेडले. तीन दिवस एयर फेसचा सराव आणि अखेर तो दिवस आला, ज्याची वाट नागपूरकरांना होती वायुसेना नगरातील मेंटेनन्स कमांडच्या परेड मैदानावर निमंत्रितांना हवाई थरार अनुभवायला मिळाला. यामध्ये सूर्यकिरण एरोबॅटीक टीम सारंग हेलिकॉप्टर ऍग्रो आकाशगंगा एअर वॉरियस ड्रिल टीम एनसीसी ग्लाइडर्स आदींचा समावेश होता. आकाशगंगा या पथकाच्या दहा योद्धांनी ८ हजार फूट उंचावर या चित्त थरारक आणि श्वास रोखून धरणाऱ्या हवाई कसरती आणि प्रत्यक्ष त्याचे  सादरीकरण केले. यामध्ये सूर्य किरण एरोबॅटिक टीम, सारंग हेलिकॉप्टर एअर डिस्प्ले टीम, आकाशगंगा टीम आणि एअर वॉरियर ड्रिल टीम यांचा समावेश होता.

स्कायडायव्हिंग, आकाशगंगा टीमचे सादरीकरण आणि एअरो मॉडलिंग शो तसेच सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या चित्तथरारक हवाई कवायतींचा आनंद घेतला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने येत्या १९ नोव्हेंबरला एअर शो आयोजित करण्यात आला आहे. त्यापूर्वी गुरुवारी सराव करण्यात आला.१४-एनसीसी एअर विंग कॅडेट्सच्या एअरो मॉडेलिंग शोच्या सरावला सुरुवात झाली. यात रिमोट कंट्रोल आणि कंट्रोल लाईन मॉडेल्स विमाने उडवले जातील. आकाशगंगा टीमचे सादरीकरण झाले.आकाशगंगाचा ध्वज घेऊन जातील आणि शेवटी संघातील तीन सदस्य आपल्या राष्ट्रध्वजाचा तिरंगा घेऊन उतरतील. यामध्ये १० हवाई योद्धे हजारो फुटावर मेंटनन्स कमांडच्या मैदानात उतरले. सारंग एरोबॅटिक हेलिकॉप्टरने देखील हवाई कवायती सादर केल्या. तर डॉर्नियर विमानातून आठ हजार फूट उंचीवर स्कायडायव्हिंग करण्यात आले. या चित्तथरारक प्रात्यक्षिकाने नागपूर थक्क झाले. एव्र्हो हे मध्यम आकाराचे वाहतूक विमानाचे उड्डाण दाखवण्यात आले. हे विमान जमिनीपासून ५०० फूट उंचीवर उडत होते.

युवकांमध्ये उत्साह

शनिवारी एअर फेस्टची पूर्वतयारी गुरुवारपासून सुरु झाली होती. यानिमित्त हवाई दलाच्या विविध विमानांनी आकाशात गिरट्या घातल्या. अनेकांशी ते कॅमेऱ्या टिपून सोशल मीडियावर शेअर केले. यासह हवाई दलाच्या हेलिकॉप्टरनेही चित्तथरारक कवायती सादर केल्या. सोनेगाव, जयताळा तसेच हवाई तळाच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरावरुनच याचा आनंद लुटला. तसेच व्हॅट्सअॅपवर स्टेटस, इन्स्टाग्रामवर स्टोरी आणि स्नॅनचॅटवर स्नॅप शेअर केले. गुरुवारी पथकाने सराव केला. तर शुक्रवारी शनिवारच्या कार्यक्रमाची रंगीत तालिम झाली. गुरुवारी सूर्यकिरण विमानाने 6 विमानांचे फॉर्मेशन तयार केले होते. तर शुक्रवारी 9 विमानांनी आकर्षक फॉर्मेशन केले. तसेच सारंग टीमनेही चार एअर क्राफ्ट डिस्प्ले केले.

This image has an empty alt attribute; its file name is WhatsApp-Image-2022-11-19-at-3.17.36-PM-1024x682.jpeg