नागपूर : नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स लिमिटेडच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिवस सेवासदन चौकातील कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने स्थानिक मान्यवर संपादक, ज्येष्ठ पत्रकार, वृत्तछायाचित्रकार यांचा स्मृतिचिन्ह, दुपट्टा व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शंखनाद न्यूज चॅनेलचे संपादक, संचालक सुनील कुहीकर, जाहिरात व्यवस्थापक विनोद अंभोरे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र उट्टलवार, लोकमत समाचारचे पत्रकार आनंद शर्मा,दैनिक भास्करचे पत्रकार प्रफुल्ल नटीये, बीसीएन न्यूजचे क्षितिज देशमुख, राजकुमार मोहोड, वृत्तछायाचित्रकार कुणाल जैस्वाल, लोकशाही वार्ताचे वृत्तछायाचित्रकार विक्की वैतागे, रितू शर्मा आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी एनसीसिएल अध्यक्ष गोविंद पसारी, सचिव तरुण निर्वाण, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप जाजू, उपाध्यक्ष विजय जैस्वाल,कोषाध्यक्ष वसंत पालिवाल, सहसचिव विवेक मुरारका, पुरुषोत्तम ठाकरे, गिरीश लिलाडिया , निखिल काकाणी, मनोज बाडगी, वेणूगोपाल अग्रवाल, प्रमोद अग्रवाल, नाथाभाई पटेल, सुशील जेजानी, लक्ष्मीकांत अग्रवाल आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे राष्ट्रीय पत्रकार दिवस,संपादक, पत्रकारांचा सत्कार
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा