नागपूर विद्यापीठ सीनेट निवडणूक : आज मतदान तयारी पूर्ण : 4 जिल्ह्यांत 85 केंद्र

0


नागपूर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) विधिसभेतील शिक्षक, प्राचार्य, संस्थाचालक प्रवर्गातील जागांसाठी रविवारी, 20 नोव्हेंबरला मतदान होत (Voting will be held on Sunday) आहे. त्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. 4 जिल्ह्यांमध्ये एकूण 85 मतदान केंद्रांवरून मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार (Voting process will be completed from 85 polling stations) आहे. प्रत्येक वर्गांसाठी मतदारांची संख्या वेगवेगळी आहे. सीनेट निवडणुकीच्या निमित्ताने सुमारे महिनाभरापासून विद्यीपीठातील वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवार रिंगणात उतरविणाऱ्या संघटनांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. आता रविवारी शिक्षक, प्राचार्य व संस्थाचालक प्रतिनिधी मतदानाचा हक्क बजावतील. कुलसचिव प्रा. राजू हिवसे यांनी सांगितले की, मतदान प्रक्रियेच सहभाग असणारे विद्यापीठाचे कर्मचारी, अधकारी शनिवारीच रवाना झाले आहेत. शहरात एकूण 29 मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रात 2-3 कर्मचारी तैनात असतील.

अशा प्रकारी सर्व केंद्रांवर एकूण 250 कर्मचारी, अधिकाऱ्यांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले आहे. नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात तयारी पूर्ण झाली आहे. निवडणुक प्रक्रियेची जबाबदारी विशेष कार्यकारी अधिकारी वसीम अहमद यांच्याकडे सोपविली गेली आहे.


निवडणुकीच्या आखाड्यात महाविकास आघाडीने सर्वच जागांवर उमेदवार उभे केले आहेत. शिक्षण मंच, नूटा आणि परिवर्तन पॅनलकडूनही पूर्ण जोर लावला जात आहे. मतमोजणी 22 नोव्हेंबरला होणार असून पदविधर वर्गासाठी 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

जळगावात केवळ 8 मतदार


जळगावातील संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालय नागपूर विद्यापीठाशी संलग्न आहे. या महाविद्यालयात 8 मतदार आहेत. त्यांच्यासाठी त्याच महाविद्यालयात मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. जळगावातील मतदान केंद्रासाठी दोन कर्मचाऱ्यांना शनिवारीच पाठविले गेले आहे. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व मतपेट्या नागपुरात एकत्र येतील. या पेट्या चोख सुरक्षा व्यवस्थेच ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

*फिश आणि चिप्स, टमाटर सॉस आणि बरितो रेसिपी | How to make Fish & Chips Recipe| Epi 25| Shankhnaad News*