८४४ रु. प्रिमियम भरणाऱ्याला ९० रुपये, तर २,४४३ रु. खर्च करणाऱ्याकडे वाचले 33 रुपये
अकोला. भविष्यातील तजविज म्हणून संकटातही शेतकऱ्यांनी पिक विमा (crop insurance ) काढून घेण्यासाठी खर्च केला. त्यातून कंपन्यांच्या तिजोऱ्या भरल्या गेल्या. शेतकरी मात्र आजही वंचितच (farmers are deprived ) आहे. नुकसान भरपाईच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टाच सुरू असल्याचे (Farmers are being mocked in the name of compensation) सर्वत्र दिसून येत आहे. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने ८४४ रुपयांचा प्रिमियम भरून आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीकडून पिक विमा कढला. या शेतकऱ्याच्या खात्यावर केवळ ९० रुपये पीक विमा भरपाई रक्कम जमा केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातही असाच प्रकार घडला. शेतकऱ्याने विम्यासाठी २,४४३ रुपये खरच् केले. कंपनीकडून भरपाई २,४७६ रुपये भरपाई मिळाली. म्हणडेच शेतकऱ्याच्या हाती केवळ 33 रुपये उरले. आम्ही पिक विमा कंपण्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठीच काढायचा काय? असा जळजळीत प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
यंदा अतिवृष्टी व परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना मदत मिळाली; मात्र ती रक्कम अतिशय कमी शेतकरी संकटात सापडला आहे.
ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला, त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळणे अपेक्षित होते; मात्र शेतकऱ्यांना त्यासाठी निवेदन देऊन, आंदोलन करून मागणी करावी लागली. त्याचा उपयोगही झाला, मात्र पीक विम्यापोटी मिळणारी भरपाई रक्कम ही शेतकऱ्यांची थट्टा करणारी आहे.
पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. बाळापूर तालुक्यातील शेतकरी प्रभाकर घोगरे यांनाही पिक विमा कंपनीचा कटू अनुभव आला. त्यांनी सांगितले की, पीक विम्याच्या भरपाईपोटी केवळ ९० रुपये प्राप्त झाले. उलट मी पीक विम्यापोटी कंपनीकडे ८४४ रुपयांचा भरणा केला आहे. जेवढ्या रकमेचा भरणा केला, तेवढीही रक्कम मिळाली नाही. मी ही मदत कंपनीला परत करणार आहे.
चिखली तालुक्यातील कोलारा येथील गजानन सोळंकी यांनी पाच एकरातील सोयाबीनचा विमा काढला होता. त्यांना २ हजार १०९ रुपये हप्ता आला. विमा काढण्यासाठी सीएससी केद्र संचालकाने १०० रुपये घेतले. सातबारा काढण्यासाठी ३० रुपये व झेरॉक्ससाठी ४ रुपये खर्च आला. सर्व्हेसाठी आलेल्या कंपनीच्या प्रतिनिधीने २०० रुपये घेतले. विमा कंपनीने सोळंकी यांच्या खात्यात पीक नुकसानीची भरपाई म्हणून २५ नोव्हेंबर रोजी २ हजार ४७६ रुपये जमा केले. त्यांनी केलेला खर्च वजा करता त्यांच्या हाती केवळ ३७ रुपये उरले.