मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर पुन्हा एका वाद उफाळून आला असताना भाजपचे ज्येष्ठ नेते व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप व सरकारच्यावतीने भूमिका स्पष्ट केली आहे. नेहरूंची ऐतिहासिक चूक दुरुस्त करण्यासाठी सुप्रीम कोर्टात आम्ही आमच्या राज्याची बाजू मांडण्यासाठी पूर्ण शर्तीने प्रयत्न करतोय व येथे पक्षीय भावना येऊ शकत नाही, असे स्पष्ट मत सुधीर मुनगंटीवार यांनी (Senior BJP Leader Sudhir Munganitwar) यासंदर्भात व्यक्त केले आहे. सीमावादावर महाराष्ट्रात आमच्यासह सर्वच राजकीय पक्षांची भावना एक आहे व यात कुठेही पक्षीय भावना येऊ शकत नाही, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
मुनगंटीवार म्हणाले की, पंडित नेहरूंची राज्य पुनर्रचना आयोगानुसार मराठी भाषिक गावे व क्षेत्र कर्नाटकाला दिले. ती नेहरूंची ऐतिहासिक चूक दुरुस्त करण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू मांडण्यासाठी शर्थीने प्रयत्न करीत आहोत. यासाठी मुख्यमंत्र्यांनी दोन मंत्र्यांवर याची जबाबदारी देखील दिली आहे. त्यामुळे येथे पक्षीय भावना येऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.