पंतप्रधान मोदींच्या जिवाला धोका असल्याचा मेसेजने खळबळ, पोलिसांकडून सखोल चौकशी

0

नवी दिल्ली: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हत्येचा कट आखण्यात आल्याची माहिती देणारा एक ऑडिओ मेसेज एका अज्ञाताकडून मुंबई वाहतूक पोलिसांच्या मोबाईल क्रमांकावर आल्याने खळबळ माजली होती. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केल्यावर वेगळाच प्रकार लक्षात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबर रोजी वाहतूक नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर 7 ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज आले होते. त्यापाठोपाठ 21 तारखेला पुन्हा 12 ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज आल्याने मुंबई पोलिस सतर्क झाले व पोलिसांनी या प्रकारच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला असता ते सर्व मेसेज मानसिक आजार असलेल्या एका बेरोजगार युवकाने केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले.
पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, मेसेज मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला. तो मेजेस पाठविणाऱ्या इसमापर्यंत पोलिस जाऊन पोहोचले. त्याची चौकशी केल्यावर वेगळाच प्रकार लक्षात आला. तो व्यक्ती पूर्वी एका हिऱ्याच्या कंपनीत दागिने डिझाईन करण्याच्या कामावर होता. मानसिक आजारामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. मागील वर्षभरापासून तो बेरोजगार असल्याचे आढळून आले. यासंदर्भात पोलिसांकडून नेमकी काय कारवाई त्या इसमावर होणार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा