टूर पॅकेजच्या नावाखाली फसवणुकीचा धोका : हिवाळयात सर्वाधिक टूर पॅकेजेसची मागणी
अमरावती. थंडीच्या मोसमात सर्वाधिक नागरिक पर्यटनांची योजना आखतात (citizens plan their tours during the winter season). काहींनी परदेशातील पर्यटनाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी तयारीही सुरू आहे. मुख्यत: हिवाळयात सर्वाधिक टूर पॅकेजेसची मागणी असते. टूर पॅकेजबाबत अनेकांकडून चौकशी केली जात आहे. आपणही पर्यटनाला जाण्याची तयारी करीत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. योग्य सावधगिरी न बाळगल्यास फसवणुकीची शक्यता (There is a possibility of fraud if proper precautions are not taken) नाकारता येत नाही. पर्यटकांकडून मागणी वाढण्याबरोबरच टूर आणि ट्रॅव्हल्स कंपन्याही आकर्षक पॅकेजसह अनेक प्रकारची प्रलोभन देत असतात. अनेक वेळा टूर आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून पॅकेजेची दिलेली ऑफर फसवी ठरते. यात पॅकेज बुक करताना वेगळे प्रलोभन दाखविले जाते. मात्र प्रत्याक्षात वेगळेच काही असते. मुळात पॅकेजमध्ये आलिशान हॉटेल्स आणि लक्झरी वाहनांची सोय राहणार असे सांगितले जाते. तसेच प्रवासाबाबत विविध सुखसुविधा मिळणार असल्याचे स्पष्ट केल्या जाते. ग्राहक याच नावाखाली पॅकेजेस बुक करतात, पण तिथे पोहोचल्यानंतर त्यांना जे दिसते ते आश्चर्यकारक असते. आलिशान हॉटेलऐवजी अतिशय स्वस्त हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची सोय केली जाते ज्यामध्ये कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. पैसे आणि टूर देऊन ग्राहक पूर्णपणे फसतात आणि ट्रॅव्हल्स कंपन्या या मजबुरीचा फायदा घेत त्यांची फसवणूक करतात. यामुळे टूर आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांवर विश्वास ठेवण्याआधी, त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. कुठेतरी जाण्याचे नियोजन केल्यानंतर अधिकृत एजंटकडून बुकिंग करा.
स्टार हॉटेलऐवजी स्वस्त हॉटेल
सध्या टूर पॅकेजची अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत, ज्यामध्ये सुरुवातीला अनेक आकर्षक आश्वासने दिली गेली होती, परंतु गंतव्यस्थानावर पोहोचल्यानंतर परिस्थिती बदलली दिसून आली आहे. पर्यटनाला जाण्यापूर्वी सर्व सुविधांबाबत तसेच पॅकेजसंदर्भात माहिती घ्यावी. पर्यटकांनी टूरचे पूर्ण पैसे कोणत्याही कंपनीला देऊ नयेत, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता असते. प्रत्येक ठिकाणी सावधगिरी बाळगणे गरजेचे असून पॅकेज बुक करताना, हिल स्टेशन किंवा इतर शहरांमध्ये नमूद केलेल्या व्ह्यू पॉईंट्स आणि हॉटेल्सची सुविधा कोणती आहे. याबाबत चौकशी करावी. एका पर्यटकाला आलेला अनुभव धक्कादायक आहे. शहरातील पंकज दातीर यांनी अलिकडेच टूर आणि ट्रॅव्हल एजन्सीकडून टूर पॅकेज बुक केले होते. 70हजार रुपयांचे पॅकेज बुक करताना त्याला हॉटेल्स आणि अनेक ठिकाणे सांगितली होती मात्र तिथे पोहोचल्यावर हॉटेलच्या अनेक सुविधांपासून वंचित राहावे लागले होते. एवढेच नव्हे तर थ्री स्टार हॉटेलऐवजी स्वस्त हॉटेलमध्ये खोल्या देण्यात आल्या होत्या. तसेच नमूद केलेल्या स्थळांची संख्याही कमी करण्यात आली होती. या संदर्भात त्यांनी संपूर्ण पॉइंट फिरवण्यास सांगितले असता त्यांच्याकडे वेळ नसल्याने जादा पैसे मागितले.
पॅकेजबाबत संपूर्ण खात्री करा
याशिवाय पर्यटक हेमंत जुगाडे यांनी सुध्दा आपला अनुभव सांगितला. ते म्हणतात, पॅकेज बुक करताना त्यांना अनेक प्रलोभने दाखविली. तसेच वेगळे वेगळे आश्वासने देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात पर्यटन करीत असताना त्या संबंधित कंपनीने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. अशी अनेक प्रकरणे शहर व परिसरात पहायला मिळतील. तज्ञांच्या मते, बहुतेक पर्यटक करार पत्र पूर्णपणे न वाचता स्वाक्षरी करतात. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शेकडो लोक ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून देश-विदेशात फिरायला जातात. यामध्ये विशेषतः उन्हाळी सुट्टी, हिवाळी सुट्टी, ख्रिसमस आणि हनिमून टूर यांचा समावेश होतो. यामध्येही शिमला, कुल्लू, मनाली, केरळ, गोवा या शहरांना बहुतांश पर्यटक पसंती देतात. पॅकेज घेताना नेटवर हॉटेलची माहिती घ्या आणि सांगितल्या जाणार्या सुविधा आहेत की नाही हे जाणून घ्या. न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण पॅकेजमध्ये समाविष्ट आहे की नाही याची देखील खात्री करुन घ्या. त्यानंतरच पर्यटनाला जाण्याचे नियोजन करा अन्यथा फसवणूक झाल्यानंतर कोणताही पर्याय नसतो. त्यामुळे पर्यटनापूर्वीच सावधगिरी आवश्यक आहे.