पाकव्याप्त काश्मीर परत मिळविण्यासाठी हालचाली? आता वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचेही संकेत

0

नवी दिल्लीः पाकव्याप्त काश्मीर अर्थात पीओके परत मिळविण्यासाठी भारताकडून हालचाली सुरु असल्याचे संकेत मिळत आहेत. मागील काही महिन्यांपासून याबाबत बरीच चर्चा सुरु असताना लष्कराचे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी (Pakistan Occupied Kashmir) आज याबाबत एक सूचक विधान केले आहे. त्यामुळे भारताने गमावलेला काश्मीरचा हा भाग परत मिळविण्यासाठी हालचाली सुरु आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारत सज्ज आहे. भारतीय सेना कुठल्याही कारवाईसाठी पूर्णपणे तयार आहे. भारत सरकार जो आदेश देईल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे लेफ्टनंट जनरल द्विवेदी (Lieutenant General Upendra Dwivedi) यांनी सांगितले. पाकव्याप्त काश्मीर हा भारताच्या उत्तरेकडचा भाग आहे. गिलगिट बाल्टिस्तानचा हा भाग पाकिस्तानच्या अखत्यारित आहे. त्यासाठी आता लष्करी कारवाई होणार की कसे, अशी चर्चा सुरु झाली आहे.
भारताचा सर्वात उत्तरेकडील भाग म्हणजे गिलगिट बाल्टिस्तान आहे. स्वातंत्र्यानंतर याच प्रदेशावर पाकिस्तानी लष्कर आणि घुसखोरांनी ताबा मिळवला आणि तेव्हापासून हा भाग पाकिस्तानकडे आहे. या प्रदेशावर भारताकडून दावा केला जात आहे. तसाच पाकिस्तानकडूनदेखील या प्रदेशावर दावा केला जात आहे. २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात येण्याची शक्यता असल्याचे विधान केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले होते. तर अलिकडेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीर भारतात परत आणण्यासाठी भारताकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून त्याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील. गिलगिट आणि बाल्टिस्तान हे प्रदेश पाकिस्तानकडून भारतामध्ये परत आणल्यानंतरच भारताचे मिशन पूर्ण होणार असल्याचे राजनाथसिंह म्हणाले होते.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा