पारशिवनीत गवसले तीन ‘मुन्नाभाई’
झोलाछाप डॉक्टरांवर गुन्हे : समितीच्या अहवालानुसार पोलिसांची कारवाई

0

पारशिवनी. रुग्णांवर उपचार करणाऱ्या तालुक्यातील तीन बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला (case was registered on three bogus doctors) आहे. तीन सदस्यीय समितीच्या अहवालानंतर ही कारवाई (action was taken after the report of the three member committee) करण्यात आली. दुर्गम भागातील नागरिकांवर हे झोलाछाप बोगस डॉक्टर अनेक वर्षांपासून उपचार (bogus doctors were treating the citizens of remote areas for many years) करीत होते. बोगस पदवीच्या आधारे त्यांनी वैद्यकिय व्यवसाय थाटला होता. त्यांच्यावर महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पारशिवनीचे तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत वाघ यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक ज्ञानबा पळनाते तपास करीत आहेत. पारशिवनी पं.स. चे गटविकास अधिकारी सुभाष जाधव, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत वाघ आणि पंचायत समितीचे ज्ञानेश्वर चोदे यांच्या समितीने हा तपास केला होता. त्यानुसार राजाराम अनंतराम गौतम रा. बखारी, प्रेमानंद बुधराम पारधे रा. बिटोली आणि योगेंद्रकुमार चौहान रा. बिटोली यांच्याविरूध्द ही कारवाई करण्यात आली. या तिन्ही डॉक्टरांविरूध्द जगदेव उरकुंडा शेंडे, मनसर यांनी पंचायत समितीकडे बोगस डॉक्टर व व्यवसाय करीत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतरच चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती.
तालुक्यातील बखारी येथील राजाराम गौतम हा गवना गरांडा या गावामध्ये न राहता गावोगावी फिरून व्यवसाय करीत होता. रुग्णांना अॅलोपॅथी औषधी द्यायचा. चौकशीदरम्यान त्याच्याकडे आयुवेंदिक व युनानी चिकित्सा परिषद, पटना(बिहार) येथील प्रमाणपत्र आढळले. ही पदवी वैद्यकिय व्यवसायासाठी अधिकृत नसल्याचे उघडकीस आले. डॉ. प्रेमानंद पारधे याच्याकडे EMPC OF INDIA चे प्रमाणपत्र असून राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षा संस्थान न्यू दिल्ली येथिल व्यवसायिक परिक्षा पास केल्याचे प्रमाणपत्र आढळले. या प्रमाणपत्रानुसार ते इलेक्ट्रो होमिओपॅथी मेडिसीन प्रॅक्टीस करू शकतात. पण, अॅलोपॅथीपध्दतीने उपचार करीत होता. डॉ. योगेद्रकुमार चौहान यांच्याकडेही गोंदिया येथील हायजीन अॅण्ड हेल्थ व्होकेशनल एज्युकेशन इंन्स्टीटयुटचे प्रमाणपत्र आढळले. ही पदवीच बोगस असल्याने कारवाई करण्यात आली. तर, माहुलीचे डॉ. नत्थु खेडीकर हे कोणत्याही प्रकारचा वैद्यकिय व्यवसाय करीत नसल्याची बाब पुढे आली.

\

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा