पारसे करतोय पोलिसांची दिशाभूल
2 वर्षात 50 हजार ईमेल पाठविले

0


नागपूर. स्वयंघोषित सोशल मीडिया विश्लेषक आणि सायबर तज्ज्ञ अजीत गुणवंत पारसे (Ajit Parse) हा अनेक दिवसांपासून प्रकृतीच्या कारणातून रुग्णालयात भरती होता. त्यामुळे पोलिसांना (Police) त्याचे बयान नोंदविता आली नाही. आता तो स्टेटमेंट देण्यासाठी पूर्णत: सक्षम आहे. मात्र चौकशीत तो पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे त्याला अटक करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. गत 2 वर्षांमध्ये पारसे याने वेगवेगळ्या लोकांना जवळपास 50 हजार ईमेल पाठविले (In 2 years Parse sent almost 50 thousand emails to different people ) असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस सर्व ईमेलचे विश्लेषण करीत आहेत. याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. पारसेला अद्याप न झाल्याने पोलिसांच्या दिशेनेही बोटे उठू लागली आहेत. पारसेच्या मागे नेमके कोण, याबाबत सर्वजण आपआपले तर्क लावत आहेत. अशावेळी नेते मंडळींनाही तो खुपू लागला आहे.


कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या पारसेचे काळे कारनामे बाहेर येताच त्याने प्रकृती बिघडल्याचे सोंग केले. त्यानंतर तो व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाला. तेथे त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला गंभीर आजार असल्याचे सांगितले. त्यानंतर तो उपचारासाठी खासगी रुग्णालयात भरती झाला. पोलिसांनुसार पारसेजवळ एक रुपयाही नाही. अशात उपचारावर होणारा खर्च कोण करतोय? हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान डॉक्टरांनी पारसे जबानी देण्यासाठी सक्षम असल्याची घोषणा केली. पोलिस त्याची जबानी घेण्यासाठी गेले, मात्र तो उडवा-उडवीचे उत्तर देत आहे. सीबीआयचे समन्स, नेत्यांचे लेटर हेड, ईमेल आणि व्हॉट्सअॅप चॅटिंगबाबत विचारले असता पारसे याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगत आहे. तो म्हणतो की, हे सर्व त्याच्या लॅपटॉप आणि ईमेलमध्ये कसे आले त्याला माहिती नाही. रात्री उशिरापर्यंत पारसे ने डॉ. मुरकुटे यांच्याशी व्हॉट्सअॅप चॅटिंग केली आहे. ईमेलही पाठविले आहेत. त्याचे म्हणणे आहे की, कोणीतरी त्याचा मोबाईल आणि ईमेल खाते हॅक करून हे सर्व केले आहे. सायबर तज्ज्ञ असलेल्या पारसेचे खात कोणीतरी हॅक करणे हे शक्य नाही. यावरून तो पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचे दिसून येते. त्याला चांगले माहिती आहे की, पोलिस त्याच्याशी बळजबरी करू शकत नाही. पोलिस कोठडीत त्याच्याकडून सत्य वदवून घेता येऊ शकते, मात्र त्याने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा