प्रा. चंद्रकांत चन्ने यांच्या काव्यसंग्रहाचे 12 रोजी प्रकाशन
नागपूर, 9 नोव्हेंबर 2022

0

ज्येष्ठ चित्रकार, कलाभ्यासक आणि कलाशिक्षक प्रा. चंद्रकांत चन्ने यांच्या “अनुत्तरित काळा कॅनव्हास ….” या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ शनिवार, 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलाच्या चौथ्या मजल्यावरील अमेय दालनात आयोजित केला आहे.
विदर्भ साहित्य संघ आणि विजय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते असून, जेष्ठ कवी आणि समीक्षक प्रा. वसंत आबाजी डहाके यांचे हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन होईल. ज्येष्ठ कवी प्रफुल्ल शिलेदार आणि चित्रकार-गझलकार बाबर शरीफ या पुस्तकावर भाष्य करतील. नाटककार दिनकर बेडेकर यांची विशेष उपस्थिती राहील.‍ साहित्यरसिक आणि कलाप्रेमी नागरिकांनी समारंभास आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा