सहा महिन्यांनंतर उलगडा ; आरोपीला तांत्रिक तपासाद्वारे अटक
मुंबई. मुंबईच्या वसई भागातून अंगाचा थरकाप उडविणारी घटना पुढे आली आहे. प्रियकराने प्रेयसीला पळवून नेले. काही दिवसांतच तिचा खून (killed girlfriend) केला. केलेले पाप लपविण्यासाठी त्याने मृत शरीराचे तब्बल 35 तुकडे (body was cut into 35 pieces) केले. एक-एक करीत ते जंगलात नेऊन फेकले. ही घटनाच समोर येणार नाही, याची सर्वस्वी काळजी त्याने घेतली होती. नेहमी सोशल मीडियावर स्टेटस बदलणाऱ्या मुलीचे अलिकडे स्टेटसच दिसत नव्हते. यामुळे तिच्या वडिलांना शंका आली. त्यानी पोलिसांत जाऊन तक्रार दिली. पोलिसांच्या तपासात भयाण वास्तव समोर आले. पोलिसांनी तांत्रिकपद्धतीने तपास करीत आरोपीला हुडकून काढत अटक केली. या प्रकरणाला लव्ह जिहादशी (Love Jihad) जोडूनही पाहिले जात आहे. श्रद्धा असे मृत प्रेयसीचे तर आफताब असे आरोपीचे नाव आहे. वसईच्या एका कॉल सेंटरमध्ये दोघेही कामाला होते. तिथेच त्यांची ओळख झाली. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
दोघांनी ‘ जियेंगे तो साथ मरेंगे तो साथ ‘ ची शपथ घेतली होती. ही बाब जेव्हा श्रद्धा च्या घरच्या लोकांना माहीत पडली तेव्हा त्यांनी या गोष्टीला विरोध केला. पण आफताब च्या प्रेमात आकंठ बुडालेल्या श्रद्धा ने घरच्यांचा विरोध झुगारत आफताब ला निवडले. घरच्यांचा विरोध पाहता श्रद्धा आणि आफताब दिल्लीला पळून गेले. तेथे ते मेहरौली ठाण्याच्या हद्दीतील छतरपूर परीसरात राहू लागले. श्रद्धाचे वडील मुलीचे सोशल मिडियावरचे स्टेटस पाहत होते. पण काही दिवसांनी श्रद्धा चे स्टेटस दिसत नसल्याने त्यांना शंका आली. त्यांनी श्रद्धा च्या नंबरवर कॉल केला असता नंबर बंद येत होता.त्यामुळे त्यांनी मेहरौली येथे येऊन संबंधित ठाण्यात श्रद्धाच्या मिसिंगची तक्रार नोंदवली. त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तवत त्यांनी छतरपूर भागातील त्यांची मुलगी राहत असलेल्या फ्लॅटमध्ये पोहोचले, मात्र तेथे तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. तेथे गेटला कुलूप होते, त्यानंतर त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.
लग्नाला घेऊन त्यांच्यात होत होते वाद
श्रद्धाच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी माहिती देणाऱ्या आणि टेक्निकल सर्व्हिलांसच्या मदतीने आफताबचा शोध सुरू केला, त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे आफताबला पकडण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की, श्रद्धा त्याच्यावर लग्नासाठी सतत दबाव आणत होती, त्यामुळे त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. या गोष्टींना कंटाळून मे महिन्यात त्याचा निर्घृण खून करून मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी जंगलात फेकून दिले.
भांडणात तोंड दाबल्याने श्रद्धाचा मृत्यू
पोलिसांनी आरोपी आफताबला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 मे रोजी आरोपी आफताब आणि श्रद्धा यांच्यात भांडण झाले होते. भांडणाच्या वेळी श्रद्धा आरडाओरडा करत होती, शेजारच्या लोकांना तिचा आवाज ऐकू येत नव्हता, त्यामुळे आरोपी आफताब याने श्रद्धाचे तोंड दाबले आणि याच दरम्यान श्रद्धाचा मृत्यू झाला. श्रद्धाला मृत पाहून आफताब घाबरला, त्यानंतर आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार केला आणि करवतीने श्रद्धाच्या मृतदेहाचे सुमारे 35 तुकडे केले.
18 दिवस मृतदेहाचे तुकडे फेकत होता
पोलfस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आफताब याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून 18 दिवस मेहरौलीच्या जंगलात फेकून दिले. आरोपी इतका हुशार होता की, श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांचे घाण वास येऊ नये म्हणून त्याने बाजारातून एक मोठा फ्रीज आणला आणि श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आफताब रोज रात्री श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे एका पिशवीत घेऊन मेहरौलीच्या जंगलात जायचा आणि तिथे पिशवीतून ते बाहेर फेकून देई, जेणेकरून जनावरे तिच्या मृतदेहाचे तुकडे खातील आणि आपण पकडले जाणार नाही.