मुंबई. कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर शिंदे गटातील आमदार आणि खासदार गुवाहाटीवरून मुंबईकडे रवाना झाले आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी बुलडाण्यातील शेतकरी मेळाव्यातून (farmers meeting in Buldana ) केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्युत्तर देत सूचक इशारा दिला आहे. आमच्यावर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोक्यांवरून टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. फ्रीजमध्ये भरून कुठे खोके गेले? (Where did the boxes go in the fridge? ) आता याचा मी शोध घेतो आणि नंतर त्याच्यावर बोलतो, असा सूचक इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. ते (ठाकरे गट ) जे बोलताहेत ते छोटे मोठे खोके आहेत. मोठे मोठे खोके घेण्याची ऐपत आमदारांची आहे का? मोठे मोठे खोके फ्रीजभरून खोके, फ्रीजच्या एवढे आणि कंटेनर भरलेले खोके कोणाकडे जाऊ शकतात आणि ते कोण पचवू शकते? हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. एक दिवस हे जनतेच्या समोर येईल. दीपक केसरकरांनी याबाबत सूचक विधान केलेले आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला थेट गंभीर इशारा दिला आहे.
आम्ही माँ कामाख्या देवीचे काल दर्शन घेतले. सर्वांनी मनोभावे पूजा केली. सर्वांचे समाधान झाले आहे. आसाम सरकारने आमचे जोरदार स्वागत केले. यानंतर आसामचे मुख्यमंत्री स्वतः आणि वरिष्ठ अधिकारी आम्ही ज्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणी आले. त्यांनी आमच्या सर्वांसाठी स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. आसाममध्ये महाराष्ट्र भवन व्हावे, अशी इच्छा अनेक भक्तांची आहे. याला आसामच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंजुरी दिली. यामुळे महाराष्ट्रातील भाविक कामाख्या देवीच्या दर्शनाला येतील तेव्हा त्यांना सुविधा होईल, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. यासोबतच महाराष्ट्रातील काही आयएएस आणि आयपीएस अधिकारी आसाममध्ये आहेत. त्यांच्यासोबतही चर्चा झाली. त्यांनीही काही विषय मांडले आणि त्यावर चर्चा करण्यात आली. आसाममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी व्हावी, असे अधिकारी म्हणाले. तसेच एक सांस्कृतिक दालन करण्याची मागणी अधिकाऱ्यांची होती. त्यालाही आसामच्या मुख्यमंत्र्यांनी होकार दिला आहे. यामुळे आसाम महाराष्ट्राचे संबंध अधिक दृढ होतील, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईमध्ये आसाम भवनसाठी जागेची आवश्यकता आहे, अशी मागणी आसाम सरकारकडून करण्यात आली. आसाम भवन उभारण्यासाठी नवी मुंबईत सिडकोच्या जागेवर हे भवन उभारता येईल, असा विचार मांडण्यात आला आणि यावर चर्चा झाली. यावर आम्ही सकारात्मक भूमिका मांडल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
देवीचे दर्शन घेवून तुम्ही महाराष्ट्रातात परतत आहात. पुढील काळात मंत्रीमंडळ विस्ताराच्या होणार आहे का? असा प्रश्न यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना विचारण्यात आला. महाराष्ट्रात गेल्यावर याची माहिती मिळेलच, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी संकेत दिलेत. उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटातील नेत्यांकडून शिंदे गटातली आमदारांवर रेडे अशी टीका करण्यात आली. यावरही मुख्यमंत्री शिंदे यांनी पलटवार केला. त्यांच्याकडून अशा अपेक्षा आहे. त्यांनी मनस्थिती ढळलेली आहे. त्यांचे धैर्य खचलेले आहे. नैराश्यातून अशी वक्तव्य केली जात आहेत. यापूर्वीही महाराष्ट्रात नैराश्याचे वातावरण होते. आम्ही नवीन सरकार बनवल्यानंतर राज्यात एक सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. जनतेचा विचार हा आमच्या सरकारच्या बाजूने आहे. त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना धडकी भरलेली आहे. त्यांना धक्क्यांवर धक्के बसत आहेत. या धक्क्यांमधून ते सावलेले नाहीत. त्यातूनच ते अशी वक्तव्य करत असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.