बल्लारशहा रेल्वे दुर्घटना प्रकरणी अखेर रेल्वेने दोन अधिकारी निलंबित केले आहेत. खासदार बाळू धानोरकर यांनी ही मागणी रेल्वे मंत्र्याकडे केली होती. निलंबन झालेल्यांमध्ये इन्स्पेक्टर ऑफ वर्क (आयओडब्ल्यू) जी. जी. राजुरकर व याच पदावरील तत्कालीन अधिकारी विनयकुमार श्रीवास्तव यांचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी सदर पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. मात्र त्यामध्ये अनेक त्रुट्या आढळल्याचे कळते. कारण त्याचवेळी सदर पुलाचे काही लोखंडी भाग कुजलेले होते. परंतु, त्रुट्या असून सुद्धा ऑडिट मध्ये याबाबत काही उल्लेख नव्हता, त्यामुळे सदर दुर्घटना घडल्याचा ठपका रेल्वे विभागाने दोन्ही अधिकाऱ्यावर ठेवला.
या दुर्घटनेत शिक्षिका नीलिमा रंगारी यांचा मृत्यू झाला. अनेक प्रवासी जखमी झाले. आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीमधून एकूण 16 लाख 50 हजार रुपयांची मदत केली आहे.
सध्या सदर पादचारी पुलाचे दुरुस्तीकरणाचे काम युद्ध स्तरावर होत आहे. मात्र, रेल्वेचे दुर्लक्ष, या सदोष पूलामुळेच अनेकांचा जीव धोक्यात आल्याची चर्चा जोरात आहे.
बल्लारशहा रेल्वे स्थानक दुर्घटना दोन अधिकारी निलंबित
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा