बल्लारशा रेल्वेस्थानकावर भीषण अपघात

0

एफओबी कोसळल्याने 13 जण जखमी


चंद्रपूर. बल्लारशा रेल्वेस्थानकावरील जीर्ण एफओबीचा काही भाग अचानक कोसळला. त्यावेळी पुलावर असणारे प्रवासी खाली कोसळून जखमी झाले. या घटनेत 13 जण जखमी झाल्याची माहिती येत असून त्यात 6 महिलांचा समावेश आहे. रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घटेनेनंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. रेल्वेस्थानकावरील यंत्रणांनी धावपळ करीत प्रवाशांना प्रथम सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवून देण्यात आले. हा पूल कालबाह्य झाला होता. त्याचे पुनर्निर्माण केले जाणार होते, अशीही माहिती पुढे येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील रेल्वे स्थानक बल्लारशा नावाने ओळखले जाते. मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बल्लारपूर स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 4 ला जोडणारा साधारण 30 फूट उंच असा हा ओव्हर ब्रीज आहे. 15 वर्षांपूर्वी हा पूल तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. देखरेखी अभावी तो जीर्ण झाला आहे. रविवारी आज सायंकाळी 5 च्या सुमारास अचानक या पुलावर लोकांना ये-जा करण्यासाठी ज्या सिमेंटच्या पट्टया टाकल्या आहेत त्या खाली रुळावर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 जवळ कोसळल्या. त्यामुळे त्यावेळी पुलावर असलेले प्रवाशीही खाली कोसळले. रेल्वे इंजिनला वीज पुरवठा करणारी पुला खालील उच्चदाब विज वाहिनीला काहींचा स्पर्ष झाल्याने ते गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. उया घटनेने रेल्वे स्थानकावर प्रचंड खळबळ उडाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी रवाना झाले आहेत.


जखमींची नावे


साची निलेश पाटील, प्रेम तितरे (45 वर्ष), चैतन्य मनोज भगत ( वय 18), निधी मनोज भगत, छाया मनोज भगत, नयन बाबाराव भिवनवार, राधेश्याम सिंग, अनुराग खरतड, रिया खरतड, स्विटी खरतड, विक्की जयंत भिमलवार, पूजा सोनटक्के (वय 37), ओम सोनटक्के. यातील राधेश्याम सिंग यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे.

बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशन वरील फुटओव्‍हर ब्रिज कोसळल्याच्या प्रकरणाची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने घेतली दखल

पालकमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना चौकशीचे आदेश

शासन स्तरावरुन मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार : सुधीर मुनगंटीवार

नोव्हेम्बर रोजी संध्याकाळी बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवरील फुटओव्‍हर ब्रिजचा एक भाग कोसळल्याने जवळपास १३ जण जखमी झाल्‍याचे प्रथम दर्शनी कळले. या सर्वांना तातडीची मदत करीत रेल्‍वे प्रशासन व पोलिस प्रशासनाने रूग्णवाहिके द्वारा रुग्णालयात पोहचवून त्‍यांच्‍यावर तातडीने उपचार सुरु झाले आहेत. यापैकी काही रुग्‍णांना चंद्रपूर येथील जिल्‍हा सामान्य रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे.
ही बातमी कळताच राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी त्वरित दखल घेत त् सर्व जखमींना आवश्‍यक त्‍या सर्व सुविधा पुरविण्‍याचे निर्देश जिल्‍हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला दिले. तसेच या घटनेची संपूर्ण चौकशी करण्‍याचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे जिल्‍हाधिकारी श्री विनयकुमार गौड़ा तथा पोलिस अधिक्षक श्री परदेशी यांना दिले आहेत. अपघातानंतर लगेचच भाजपाचे बल्‍लारपूर येथील पदाधिकारी रेल्‍वे स्‍टेशनवर पोहचून त्‍यांनी जखमींना ताबडतोब मदत केली. या प्रकरणी शासन स्तरावरुन मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

*आलू पराठा आणि कटलेट्स रेसिपी ट्रान्सजेंडर मोहिनी सोबत शंखनाद कीचनमध्ये | Epi 39| Aloo Paratha

Recipe*

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा