बांबूच्या नवनवीन प्रजाती देशात वाढविणार : ना. सुधीर मुनगंटीवार

0

नागपूर : एकीकडे जगात 12 50 प्रकारच्या बांबूच्या प्रजाती असताना भारतात मात्र केवळ 123 प्रकारच्या बांबूच्या प्रजाती आहेत. संशोधनातून या बांबूच्या प्रजाती वाढविण्याचा, बांबूचा उपयोग वाढविण्याचा मानस राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. ( bamboo )

ऍग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात ( Agrovision Agricultural Exhibition ) आले असता शंखनाद न्यूज चॅनलशी ( shanknad news channel ) बोलताना त्यांनी बांबू विषयक संशोधनाला कसा वाव दिला जात आहे याविषयीची सविस्तर माहिती दिली. बांबू रिसर्च सेंटर, बांबू बोर्ड या माध्यमातून विविध कृषी विद्यापीठात बांबू विषयक संशोधन केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. किंबहुना विविध प्रकारच्या वस्तूंसाठी बांबूचा कसा उपयोग होईल, यातून अधिकाधिक रोजगार निर्मिती कशी होईल, कष्टकऱ्यांचे जीवन सुखी कसे होईल हाच आपला प्रयत्न असल्याचे नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, माझा विदर्भातील शेतकरी ,माझा कष्टकरी कसा सुखी होईल नवनवीन तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत कसे पोहोचेल, त्याचा शेतीसाठी कसा उपयोग होईल, अडचणीतल्या शेतकऱ्यांनी परिस्थिती कशी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होईल याच उद्देशाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सतत प्रयत्न राहिला आहे. ऍग्रोव्हिजन प्रदर्शन विदर्भच नव्हे तर मध्य भारतातील शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरले आहे असा विश्वास राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बोलून दाखविला.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा