बाळ चोरी प्रकरणाचा 5 तासांत छडा

0

नागपूर पोलिसांची कामगिरी, 8 महिन्यांचे बाळ आईच्या स्वाधीन
नागपूर. घरात खेळणारे बाळ अचानक बेपत्ता झाले. जवळचे कुणी बाळाला खेळण्यासाठी घेऊन गेले असावे, असा आई-वडिलांचा समज झाला. दुपारपासून बाळाचा शोध सुरू केला. पण, त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. कासाविस झालेल्या आही- वडिलांनी अखेर गुरुवारी रात्री पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत. तपासचक्र वेगात फिरविली. पोलिस अधिकारी तपासावर सतत लक्ष ठेवून होते. पोलिसांनी सर्वच शक्यता परताळून बघत पाच तासांमध्ये या बाळ चोरीच्या प्रकरणाचा छडा (Solve the baby theft case within 5 hours) लावला. आरोपीकडून बाळाला ताब्यात घेत आईच्या स्वाधीन (8 months old baby in mother’s hands) केले. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना उघडकीस आली होती. मुंबईच्या नायर रूग्णालयातून चोरीला गेलेल्या पाच दिवसांच्या बाळाचा मुंबई पोलिसांनी असाच पाच तासात छडा लावत बाळाला आईकडे सोपवले होते. नागपूरच्या घटनेमुळे मुंबईच्या घटनेलासुद्धा उजाळा मिळाला.
जितेंद्र निशाद असे या आठ महिन्यांच्या अपहृत बाळाचे नाव आहे. त्याचे आई-वडील कळमना हद्दीत राहतात. शेजाऱ्यानेच घरून मुलाचे अपहरण केले. हा मुलगा दुपारपासूनच घरी दिसून आला नाही. त्याच्या आई वडीलांनी दिवसभर मित्र, नातेवाईकांकडे शोधाशोध केली. त्या नंतरही मुलगा आढळून आला नाही. शेवटी गुरूवारी रात्री आई वडीलांनी कळमना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यात शेजाऱ्यानेच मुलाचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला.
अपहरणकर्त्याचा घेतला शोध
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कळमना पोलिसांसोबतच यशोधरा पोलिसांनीही शोध सुरू केला. पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासात मोलाच्या सूचना केल्या. पोलिसांनी वेगाने तपास करीत अवघ्या पाच तासात अपहरणकर्त्यांचा शोध घेत मुलाची सुखरूप सुटका केली व मुलाला आईच्या स्वाधीन केले. नागपूर पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. आरोपीसंदर्भातही माहिती गोळा केली जात आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा