भाग्यश्री विसपुते नव्या सीईओ
योगेश कुंभेजकर भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी

0


नागपूर. नागपूर जिल्हा परिषदेच्ये मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) योगेश कुंभेजकर (Yogesh kumbhejka) यांच्याकडे भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते (Bhagyashre Vispute) यांची बदली करण्यात आली आहे. त्या नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतील. नव्या सीईओ भाग्यश्री विसपुते या 2017 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. नागपूर जिल्हापरिषदेची धुरा महिलांच्या खांद्यावरच आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदी महिलांच आहेत. त्यांच्या जोडीला आता सीईओसुद्धा महिलाच असल्याने नागपूर जिपत खऱ्या अर्थाने महिलाराज असणार आहे.
योगेश कुंभेजकर यांच्याकडे भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सोबविली गेली आहे. ते 2016 बॅचचे सनदी अधिकारी आहेत. कुंभेजकर यांनी कोविडचा प्रादुर्भाव सुरू होताच नागपूर जिपच्या सीईओ पदाचा कारभार हाती घेतला होता. त्यांनी यादरम्यान जिल्ह्यात कोविड प्रादुर्भाव आटोक्यात राहावा यासाठी विशेषतत्त्वाने प्रयत्न केलेत. याकाळात त्यांनी तत्त्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासमवेत जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात राहण्यासोबतच नागरिकांनीही कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे यासाठी गावी भेटी करून नागरिकांमध्ये जनजागृती केली. याशिवाय एक उत्तम प्रशासक म्हणूनही त्यांची ख्याती राहिली आहे. त्यांनी प्रशासनातील अधिकारी कर्मचाºयांच्या रखडलेले पदोन्नतीसह विविध विषय मार्गी लावण्याचा इतिहास रचला. तसेच चुकीला माफी नाही. या धोरणाचा अवलंब करत त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनासोबतच वेतनवाढ रोखण्याच्यादेखील शेकडो कारवाया केल्यात. यामुळे जिपतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कामकाजही रूळावर आले होते. ग्रामीण भागातून येणाºया नागरिकांना वारंवार जिपच्या चकरा माराव्या लागू नये, यासाठी त्यांनी झिरो पेंन्डेंसीचा अवलंब केला. जिपचे सर्व कामकाज (फाईली) त्यांनी ऑनलाईन ट्रॅकिंग प्रणालिशी जोडलेत. यामुळे कुठली फाईल, कुठल्या टेबलवर किती दिवस राहिली याची इंत्यभूत माहिती मिळत असे. विशेष म्हणजे त्यांनी सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे, जमिनीतील भूजल पातळी वाढविण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’वर भर दिला. मनरेगासह १५ व्या वित्त आयोग आणि विविध निधीतून त्यांनी हजारो रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे हाती घेतली असून, यातील काही कामे पूर्णही झाली आहे.

शितल उगले सोलापूरला
वस्त्रोद्योग विभागाच्या संचालक शितल उगले – तेली यांची सोलापूर महापालिकेच्या आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्या भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) 2009 बॅचच्या अधिकारी आहेत. त्यांनी नागपूर सुधार प्रण्यासच्या सभापती म्हणूनही जबाबदारी सांभाळली. सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शीवशंकर यांची वस्त्रोद्योग विभागाचे संचालक म्हणून नागपुरात बदली करण्यात आली आहे. ते भारतीय प्रशासकीय सेवेतील 2011 बॅचचे अधिकारी आहेत.