भारताचा न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय

0

भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात माऊंट मॉन्गनुई येथील बे ओवल क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात भारताने 65 धावांनी विजय मिळवला आहे. आधी फलंदाजी करत भारताने सूर्यकुमार यादवच्या (suyakumar Yadav) नाबाद 111 धावांच्या जोरावर न्यूझीलंडसमोर 192 धावांचं आव्हान ठेवले. जे पूर्ण करताना न्यूझीलंडचा संघ 126 धावांत सर्वबाद झाला. दीपक हुडाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. ज्यामुळे सामना भारताने 65 धावांनी जिंकला.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी निवडली. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताची सुरुवात ठिकठाक झाली. ईशान किशन (Ishan Kishan) चांगली फलंदाजी करताना दिसत होता. पण पंत 13 चेंडूत 6 धावा करुन बाद झाला. मग सूर्यकुमार फलंदाजीला आला आणि त्यानेही फटकेबाजी सुरु केली. तितक्यात ईशान किशन 36 धावा करुन बाद झाला. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि हार्दिक (Hardik Pandya) यांनीही प्रत्येकी 13 धावा केल्या. पण सूर्युकमार मात्र तोवर तुफान फॉर्मात आला होता. तो चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत होता. 49 चेंडूत त्याने शतक पूर्ण केलं. भारत 200 पार जाईल असं वाटत होतं. पण अखेरच्या षटकात भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या टीम साऊदीनं हॅट्रीक घेतली. ज्यामुळे भारत 191 धावा करु शकला,

सूर्यकुमार यादवने ३२ चेंडूंत अर्धशतक झळकावले अन् पुढील १७ चेंडूंत वादळ आणले; पाहा Video इशान किशन ( ३६)  व रिषभ पंत ( ६) यांना सलामीला पाठवण्याचा प्रयोग फसला. सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) पून्हा संकटमोचक ठरला. त्याने ४९ चेंडूंत ११ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने नाबाद १११ धावा चोपल्या.  कर्णधार हार्दिक पांड्या ( १३) व श्रेयस अय्यर ( १३) यांनी सूर्यासोबत समाधानकारक भागीदारी केली. सूर्या व श्रेयस यांनी २१ चेंडूंत ३९ धावांची भागीदारी केली.  हार्दिकने  चौथ्या विकेटसाठी सूर्यासोबत ४० चेंडूंत ८४ धावांची भागीदारी केली. टीम साऊदीने अखेरच्या षटकात हॅटट्रिक घेतली. हार्दिक, दीपक हुडा व वॉशिंग्टन सुंदरला त्याने बाद केले. भारताच्या एकूण धावसंख्येतील ६९ धावा या अन्य फलंदाजांच्या व ११ अतिरिक्त धावा आहेत.

प्रत्युत्तरात मैदानावर आलेल्या यजमानांना भुवनेश्वर कुमारने दुसऱ्याच चेंडूवर धक्का देताना फिन अॅलनला भोपळ्यावर बाद केले. डेव्हॉन कॉनवे व कर्णधार केन विलियम्सन या दोघांनी ५६ धावांची भागीदारी करताना न्यूझीलंडचा डाव सावरला. पण, वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात कॉनवे २५ धावांवर झेलबाद झाला. ग्लेन फिलिप्स आक्रमक खेळ करण्याच्या पवित्र्यातच मैदानावर उतरला होता. पण, युजवेंद्र चहलने संथ चेंडू टाकून फिलिप्सचा (  १२) त्रिफळा उडवला आणि किवींना ६९ धावांवर तिसरा धक्का दिला. दीपक हुडा, युजवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर टिच्चून मारा करताना किवींच्या धावांना लगाम लावून बसले होते. त्यामुळे रन रेट वाढताना दिसला अन् तो कमी करण्याच्या प्रयत्नात डॅरील मिचेल ( १०) हुडाला विकेट देऊन माघारी परतला. न्यूझीलंडचा निम्मा संघ ८९ धावांवर माघारी परतला होता आणि त्यांना अखेरच्या ६ षटकांत विजयासाठी १०१ धावा करायच्या होत्या. केन हा एकमेव आशेचा  किरण त्यांच्यासाठी मैदानावर होता. पण, भारतीय गोलंदाजा चांगली कामगिरी करत होते. युजवेंद्रने २६ धावांत २ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने १६व्या षटकात चार निर्धाव चेंडू टाकताना मिचेल सँटरनची विकेट घेऊन किवींच्या अडचणी वाढवल्या. केनने अखेरच्या काही षटकांत फटकेबाजी केली, परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता. केन ५२ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांवर माघारी परतला. हुडाने १९व्या षटकात ३ विकेट्स घेत न्यूझीलंडचा संपूर्ण संघ १२६ धावांत तंबूत पाठवला. हुडाने १० धावांत ४ विकेट्स घेतल्या आणि भारताने ६५ धावांनी सामना जिंकला.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा