भारत जोडो यात्रेत संदेश सिंगलकर यांचा सहभाग

0

राहुल गांधींसोबत चर्चेचीही मिळाली संधी


नागपूर. काँग्रेसतर्फे खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात सुरू असलेली देशव्यापी भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातून (Maharashtra) पुढे सरकत आहे. यात्रेत सर्वच स्तरातील नागरिकांचा सहभाग लाभत असल्याने यात्रेच्या मार्गावर जनसागर उसळल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातील सामान्य नागरिक स्वयंप्रेरणेने यात्रेत सहभागी होत आहेत. नागपुरातूनही (Nagpur) मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होण्यासाठी गेले आहेत. काँग्रेस नेते संदेश सिंगलकर (Congress leader Sandesh Singalkar) हेसुद्धा राहुल गांधी यांच्यासोबत दररोज 20 -25 किमीचे अंतर कापत आहेत. यात्रेदरम्यान त्यांना राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेचीही संधी मिळाली.


यात्रेदरम्यानचे अनुभवाबाबत त्यांनी सांगितले की, सामान्यांचा मोठा प्रतिसाद यात्रेत मिळत आहे. जाहीर सभेच्या ठिकाणीही अलोट गर्दी उसळत आहे. अबालवृद्ध गर्दी करीत आहेत. महिला, शेतकरी, युवकही उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी येत असल्याने ही पदयात्रा चैतन्यदायी ठरली आहे. महगाई, भेदभाव व बेरोजगारी हे सर्वसामान्यांशी संबंधित विषय भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने पुढे रेटले जात आहेत. देश व संविधान रक्षासंदर्भात लोकांमध्ये आत्मविश्वास वाढत आहे. पदयात्रे दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूने पारंपरिक वेशभूषेत विविध समाज, संप्रदायाचे नागरिक उभे राहून स्वागत करीत आहेत. ‘एक ही आंधी, राहूल गांधी राहूल गांधी’, ‘नफरत छोडो, भारत जोडो’ यासारख्या गगनभेद नाऱ्यांमुळे संपूर्ण परिसर दणाणत आहे. यात्रेमुळे निश्चितच देशाला नवी दिशा मिळेल, देशातील चित्र नक्की पालटलेले दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला