भ्रष्टाचारात अडकलेला केजरीवाल यांचा मंत्री कारागृहात घेतोय मसाज!

0

नवी दिल्ली: दिल्लीतील केजरीवाल सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन हे भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मागील काही महिन्यांपासून तिहार कारागृहात आहेत. मात्र, कारागृहातही त्यांना कशा व्हिआयपी सुविधा मिळत आहेत, याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सत्येंद्र जैन हे कारागृहात मसाज घेतल्याचा हा व्हिडिओ असून (AAP Minister Satyendra Jain gets massage in Tihar jail) भाजपने यामुद्यावर केजरीवाल सरकारवर टीका केली. प्रामाणिकपणाचा आव आणणारे केजरीवाल यांनी सत्येंद्र जैन यांना तात्काळ मंत्रिपदावरून बरखास्त करावे, अशी मागणी भाजपने केली आहे. तर सत्येंद्र जैन यांना उपचार म्हणून मालीश दिली जात असल्याचा दावा आम आदमी पार्टीचे नेते व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे. या प्रकरणी ईडीने न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.


मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये तिहार जेलमध्ये असलेले दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओनंतर जेल प्रशासनावर आक्षेप घेतले जात आहेत.
दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन हे मनी लाँड्रिंग प्रकरणात मागील काही महिन्यांपासून तिहार कारागृहामध्ये आहेत. अलिकडेच न्यायालयाने जैन यांच्यावर ठपका ठेवला असून त्यांचा जामीनही नाकारला आहे. मात्र, तरीही केजरीवाल सरकारने जैन यांना मंत्रीपदावर कायम ठेवले आहे. जेलमध्ये असूनही जैन हे सुखासीन आयुष्य जगत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सीवीटीव्ही फुटेजमध्ये ते कारागृहात मसाज घेत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हीडिओ समोर आल्यानंतर भाजपने आम आदमी पार्टीवर निशाणा साधला आहे.


आपचा दावा


दरम्यान, जैन यांना आजारपणावर फिजिओथेरपी म्हणून मसाज दिला जात आहे व तो डॉक्टरांच्या सांगण्यावरुन दिला जात असल्याचा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे. भाजप एका आजारी माणसाबाबत घाणेरडे राजकारण खेळत असल्याचा आरोपही सिसोदिया यांनी केला आहे. सत्येंद्र जैन हे कारागृहात पडले होते. त्यामुळे त्यांना दुखापतही झाली होती, असे ते म्हणाले.


सत्येंद्र जैन यांना ३० मे रोजी ईडीने ताब्यात घेतले होते. सत्येंद्र जैन हे तिहार जेलमध्ये सात नंबरच्या सेलमध्ये आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर जेल अधीक्षक यांच्यासह चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. शिवाय ३५ पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीचे ठिकाण बदलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

फिश आणि चिप्स, टमाटर सॉस आणि बरितो| Fish,Chips,Tomato Sauce & Burrito Recipe |Epi 36|Shankhnaad News

https://www.youtube.com/watch?v=F5ze5Xhxo7o