मतिमंत मुलीला रॉकेल ओतून पेटविण्याची धमकी देणाऱ्यास सश्रम कारावास

0

न्यायालयाने ठोठावली शिक्षा : लाखांदूर तालुक्यात घडली होती घटना


भंडारा. घरी एकट्या असलेल्या अल्पवयीन मतिमंद मुलीला (minor mentally retarded girl ) मारहाण करण्यात आली. त्यानंतर रॉकेल ओतून पेटविण्याची धमकी देण्यात आली. या आरोपी तरुणाला भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा (Punishment of imprisonment) ठोठावली. नानेश्वर विठोबा राऊत (वय 35) रा. मोहरणा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मोहरणा (Mohrana in Lakhandur Taluka of Bhandara District) येथे 27 मे 2017 रोजी घडली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अटक केली. घटनेच्या सुमारे पाच वर्षांनंतर आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेनंतर आरोपीविरोधात जनक्षोभ उसळला होता. न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. अशा नराधमांना धडा देणे त्यांची मस्ती जिरवणे आवश्यकच असल्याची भावना व्यक्त होते आहे.
अल्पवयीन मतिमंद मुलगी घरी एकटी घरी होती. तिची आई शेतातून घरी आली. तेव्हा मुलगी जोरजोराने रडत असल्याचे दिसून आले. तिला विचारले असता नानेश्वर राऊत याने घरात प्रवेश करून मुलीला मारहाण केली होती. तसेच तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याची धमकी दिल्याचे पीडित मुलीनं सांगितलं.
नानेश्वरनं मंतिमंद मुलीला मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही आपबिती मुलीनं आई घरी आल्यानंतर सांगितली. तिच्या आईने पोलिस ठाणे गाठले.लाखांदूर पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्यात आली. पोलिसांनी 354 अ (2) 451, 323 सह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी गांभीर्याने घेतला. नानेश्वर राऊत याला अटक केली.
साक्षीपुरावे गोळा करून आरोपपत्र प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. अतिरिक्त व सत्र न्यायाधीश पी. बी. तिजारे यांनी साक्षी पुरावा तपासला. याअंती आरोप सिद्ध झाले. नानेश्वर राऊत याला पाच वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पाच वर्षानंतर का असेलना पीडित मुलीला न्याय मिळाला आहे.