मनी लाँड्रिंग प्रकरणात ऋषीकेश देशमुख यांना जामीन मंजूर

0

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषीकेश देशमुख यांना मुंबईच्या पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ऋषीकेश यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. शंभर कोटी रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी हा जमीन मंजूर झाला आहे. सीआरपीसीच्या कलम ८८ अंतर्गत ऋषीकेश देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर कोर्टाने सुनावणीनंतर त्यांना तीन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.(Bail for Anil Deshmukh son Rishikesh Deshmukh) ऋषिकेश देशमुख यांचा मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभागी असल्याचा त्यांच्यावर ठपका आहे.


ऋषिकेशला जामीन मंजूर झाल्यास त्याच्याकडून या प्रकरणातील पुरावे प्रभावित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करू नये, अशी विनंती ईडीने न्यायालयाकडे केली होती. मात्र, आज, सोमवारी मुंबई सत्र न्यायालयाकडून अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १०० कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जामीन मंजूर केला आहे. कलम ८८ सीआरपीसी अंतर्गत जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ऋषिकेश देशमुख यांना तीन लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.​मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी वसूलीचे आदेश दिले होते. या आरोपांची सीबीआय आणि ईडी तपास करत आहे. या प्रकरणात ऋषिकेश देशमुख देखील सक्रिय असल्याचा आरोप आहे. अनिल देशमुख सध्या या प्रकरणात तुरुंगात आहेत.
अनिल देशमुख यांना या प्रकरणात 4 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर केला असला तरी सीबीआयकडून दाखल केलेल्या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर केलेला नाही.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा