महारायत अॅग्रो इंडियाचा संचालक गजाआड

0

कडकनाथच्या नावाने फसवणूक : राज्यभरात शेकडो शेतकऱ्यांना लावला चुना


नागपूर. महाराष्ट्रातील शेकडो शेतकऱ्यांची कडकनाथ जातीच्या कोंबड्यांचे (Kadkanath breed of chickens ) पालन आणि नंतर ते खरेदी करण्याच्या नावावर तब्बल 1.65 कोटी रुपयांनी फसवणूक केल्या प्रकरणी शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Financial Offenses Wing of City Police) महारायत अॅग्रो इंडिया कंपनीच्या एका संचालकाला अटक (Director arrested) केली आहे. 2 वर्षांपूर्वी मे 2020 मध्ये बजाजनगर पोलिस ठाण्यात महारायत आणि रायत अॅग्रो कंपनीचे संचालक सुधीर शंकर मोहिते, संदीप सुभाष मोहिते, हनुमंत जगदाळे आणि इतरांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता. कडकनाथ जातीचे कोंबड्याचे काळ्या रंगाच्या चिकनला मध्यभारतात विशेषत: मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये खूप मागणी आहे. 900 रुपये प्रति किलोपर्यंतच्या दराने हे चिकन विकल्या जात असल्याचा दावा करीत मोठे उत्पन्न मिळवून देण्याचे स्वप्न दाखवून शेतकऱ्यांकडून रक्कम घतेली. व्यवसाय मात्र केला नाही. गुंतवणूकदारांचे पैसेही परत दिले नाही.
कंपनीने कडकनाथ जातीच्या पिल्ल्यांची संख्या वाढविणे आणि नंतर ते पिल्ले मोठे होऊन कोंबड्यात रुपांतर झाल्यानंतर खरेदी करण्याच्या योजनेच्या नावावर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून घेतली. त्यांच्या जाळ्यात अडकून शहरातील 111 शेतकऱ्यांनी आरोपींच्या कंपनीत एकूण 1.64 कोटी रुपये गुंतविले. आरोपींनी पैसे तर घेतले, मात्र व्यवसाय केला नाही. पीडितांनी बजाजनगर पोलिसात तक्रार केली. त्याचप्रमाणे सांगली, पुणे, पालघर, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकमध्येही कंपनीने जाळे पसरवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने तक्रार नोंदविण्यात आली होती. कोल्हापूरच्या एका प्रकरणात आरोपी कारागृहात बंद होते. हे प्रकरण अनेक दीर्घ कालावधीपासून थंड बस्त्यात होते. बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेने सुधीर मोहितेला कोल्हापूरच्या तुरुंगातून प्रोडक्शन वॉरंटवर अटक केली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 28 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. महारायत कंपनीकडून आणखी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी ईओडब्ल्यूचे पोनि अनिरुद्ध पुरी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. उल्लेखनीय आहे की, राज्यभरात या कंपनीने 1500 हून अधिक शेतकऱ्यांना चुना लावला आहे. फसवणुकीचा आकडा 500 कोटीहून अधिक आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा