महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला नेहरू जबाबदार- भाजप नेते सुधीर मुनगंटीवार

0

नागपूरः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाला पं. नेहरू जबाबदार असून त्यांनी केलेली चूक कर्नाटक सीमेवरील मराठी माणसाला भोगावी लागत असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (BJP Senior Leader Sudhir Mungantiwar on Border Dispute) यांनी व्यक्त केली आहे. नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार यांनी सध्या सुरु असलेल्या वादावर भाष्य केले. मुनगंटीवार म्हणाले, “प. नेहरुंनी केलेली चूक कर्नाटकच्या सीमेवरील मराठी माणसाला भोगावी लागते आहे. त्यांनी राज्य पुर्नरचना आयोगाच्या माध्यमातून केलेली चूक आजही त्रासदायक ठरते आहे. अनेक वर्षंपासून हा संघर्ष असाच सुरू आहे. हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ४० गावांच्या संदर्भात दोन्ही राज्य सकारात्मक असतील. तर निश्चितपणे सर्वोच्च न्यायालय दोन्हीही राज्यांचे म्हणणे ऐकूण योग्य तो निर्णय देईल, असेही मुनगंटीवार म्हणाले.
मुनगंटीवार म्हणाले, मी जेव्हा जेव्हा महाराष्ट्र एकिकरण समितीच्या नेत्यांना भेटलो, तेव्हा त्यांची महाराष्ट्रात येण्याची तीव्र इच्छा मला जाणवली. त्यामुळे कर्नाटकमधील मराठी जनतेला महाराष्ट्रात यावे, असे वाटणे, स्वाभाविकही आहे. त्यांना आजही वाटते की आपण महाराष्ट्रात जावे. मात्र, त्यांना नेहरुंच्या चुकीचे परिणाम भोगावे लागत आहेत, याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले. जत गावातील ग्रामपंचायती कर्नाटकमध्ये जाण्यासाठी इच्छूक असतील, तरीही हा प्रश्न सुटणार नाही. मग कर्नाटकमध्ये जी गावे आहेत व ज्यांना महाराष्ट्रात यायचे आहे, त्यांचे काय होणार? मुळात या ४० गावांना महाराष्ट्र सरकार एवढी मदत आजपर्यंत कोणीही केली नाही. मदत करण्यात जेवढा महाराष्ट्र पुढे आहे, तेवढे देशातील कोणतेही राज्य नाही. त्यामुळे सरकारने मदत केली नाही, म्हणून जर ही गावे कर्नाटकात जायचा ठराव करत असतील तर ही आश्चर्याची बाब आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

*चीज कॉर्न पत्तागोभी पुलाव & पाईनॲपल चिरोटे|Cheese Corn Cabbage Pulao Recipe |Epi.38| Shankhnaad News*