महावितरण कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

0

अंगावर ओतले पेट्रोल ; नागरिकांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
दर्यापूर (अमरावती) : कृषिपंपाच्या जोडणीसाठी (connection of agricultural pump ) अर्ज केल्यानंतर दीर्घ काळ प्रतीक्षा करूनही हाती काहीच लागले नाही. या प्रकाराने संतापलेल्या खोलापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिंगणापूर येथील शेतकऱ्याने (farmer from Shingnapur) सोमवारी दर्यापूर येथील महावितरण कार्यालयात पेट्रोल अंगावर घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न (attempted self-immolation by dousing himself with petrol at the Mahavitaran office in Daryapur) केला. उपस्थित नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. शेतकऱ्याचा अर्ज २०२० मध्येच महावितरणकडून मंजूर करण्यात आला होता. मात्र, दोन वर्षांचा कालावधी लोटूनही वीज जोडणीमात्र दिली गेली नाही. पिकाला पाण्याची गरज असल्याने शेतकऱ्याकडून वीजजोडणीसाठी सतत पाठपुरावा केला जात होता. पण, कुणीच दखल घेत नसल्याने अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलले. एकीकडे थकबाकी वसुलीकडे महावितरणकडून जोर लावला जात आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही कृषीपांपांचे कनेक्शन कापले जात आहे. दुसरीकडे ग्राहकांच्या कामांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. महावितरणने नुसते महसुलामागे न धावता ग्राहक सेवेकडेही घालावे, अशा मागणी केली जात आहे.
शिंगणापूर येथील शेतकरी अमोल मनोहरराव जाधव यांच्याकडे अडीच एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी २०२० मध्ये दर्यापूर महावितरण कार्यालयात कृषिपंपाच्या वीजजोडणीसाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांना वीजजोडणी करून देण्यात आली नाही. वारंवार वीज कार्यालयात चकरा मारून थकलेल्या संतप्त शेतकऱ्याने सोमवारी दर्यापूर येथील महावितरण कार्यालयात जाऊन स्वतःच्या अंगावर पेट्रोल घेऊन जाळून घेण्याचा प्रयत्न केला.
सुदैवाने आजूबाजूला उपस्थित असलेल्या नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी अमोल जाधव यांच्या हातातील पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली. यामुळे कार्यालयात चांगलीच खळबळ उडाली होती. याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी उपकार्यकारी अभियंता चेतन मोहोकार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी रजेवर मुंबईला असल्याचे सांगितले.
महावितरणचे अधिकारी मात्र शेतकऱ्यालाच दोषी ठरवित आहेत. शेतकऱ्याच्या जोडणीला 2020 मध्येच मजुरी दिली गेली. पण, त्यानंतर त्यांनी कार्यालयाशी कधीही संपर्क केला नाही. यामुळेच वीजजोडणी होऊ शकली नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.