महिलांचा अवमान करणारे वक्तव्य, योगगुरु बाबा रामदेव यांनी अखेर व्यक्त केली दिलगिरी

0

पुणे : महिलांसंदर्भात बाबा रामदेव यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागितली (Yoga Guru Baba Ramdev) आहे. राज्य महिला आयोगाने त्यांच्या विधानाची गंभीर दखल घेत रामदेवबाबा यांना दोन दिवसात खुलासा करण्याची नोटीस पाठवली होती. त्यानंतर रामदेवबाबा यांनी आपल्या वक्तव्याने भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. बाबा रामदेव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी वादग्रस्त विधान केले होते.रामदेव बाबांनी ईमेलद्वारे खुलासा करत वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. मी आई आणि मातृशक्तीचा नेहमीच गौरव केला आहे. मी एक तासाच्या प्रवचनात महिलांच्या वस्त्रांसंबंधी जे वक्तव्य केले, त्याचा अर्थ माझ्याप्रमाणे वस्त्रांप्रमाणे साधी वस्त्रे असा होता. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दांनी ज्यांना वाईट वाटले त्यांची मी निरपेक्ष भावनेने क्षमा मागतो, असेही ते म्हणाले आहेत.


महिला संमेलनात बोलताना योगगुरु बाबा रामदेव यांनी महिला साड्या नेसून पण चांगल्या दिसतात, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने पाहता काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात, असे रामदेव बाबा म्हणाले. या वक्तव्यावर महिला वर्गात संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यावर आंदोलनही झाली. आता रामदेवबाबा यांनी माफी मागितली आहे. रामदेवबाबा यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993 नुसार मी कुठलाही अपराध केलेला नाही. मी जागतिक स्तरावर महिला सबलीकरणासाठी काम करत आलो आहे. जेणेकरुन महिलांना समाजात समानतेचा दर्जा प्राप्त होण्यास मदत होईल. भारत सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या योजनांना प्रोत्साहन दिलंय. इतकंच नाही तर महिलांचं समाजातील स्थान मजबूत करण्यासाठी विविध संघटनांच्या साथीने कामही केले आहे. महिलांचा अपमान करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. महाराष्ट्रातील ठाण्यात आयोजित कार्यक्रम महिला सशक्तीकरणासाठी होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लीपमधून माझ्या शब्दांना चुकीचा अर्थ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

जाम कोकोनट मफिन्स आणि मशरूम ओनियन पाई | Jam Coconut Muffins & Mushroom Onion Pie Recipe Episode 42