महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस

0

महिला (Women) दिनासारख्या दिवसांमध्ये महिलांच्या हक्कांवर खूप चर्चा केली जाते. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे महिलांवरील हिंसाचार संपवण्यासाठी एक दिवस स्वतंत्रपणे देखील साजरा केला जातो. दुर्दैवाने, ती एक मोठी गरज बनली आहे. एवढेच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये जिथे महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अनेक अधिकार मिळाले आहेत. तरीही महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठीच्या आंतरराष्ट्रीय दिवसाची (International Day for the Elimination of Violence against Women) प्रासंगिकता कायम आहे. ते पाळण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) दरवर्षी 25 नोव्हेंबरचा दिवस निश्चित केला आहे. यावेळी संयुक्त राष्ट्रांनी कोरोना काळात महिलांवर होत असलेल्या अत्याचारांमध्ये वाढ झाल्यावर चिंता व्यक्त केलीय. ( International Day for the Elimination of Violence against Women )

    ऐतिहासिक महत्व

    • २५ नोव्हेंबर ही तारीख १९६० च्या डोमिनिकन रिपब्लिकमधील राजकीय कार्यकर्त्या असलेल्या ३ मीराबल बहिणींच्या हत्येच्या तारखेवर आधारित
    • हत्येचे आदेश तत्कालीन डोमिनिकन हुकूमशहा राफेल ट्रुजिलो (Rafael Trujillo) यांच्याकडून
    • १९८१: लॅटिन अमेरिकन कार्यकर्ते आणि कॅरिबियन फेमिनिस्ट एन्कुएन्ट्रॉस (Encuentros) यांच्याकडून २५ नोव्हेंबरला महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराबद्दल व्यापकपणे जनजागृती करण्याचा दिवस म्हणून साजरा करण्याचे प्रयोजन

    महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिनाबद्दल

    उद्दीष्ट

    • जगभरातील महिलांच्या स्थितीबाबत जागरूकता निर्मिती
    • त्यांच्या पुढील अधिनतांना वाचा फोडणे
      • बलात्कार
      • घरगुती हिंसाचार
      • हिंसाचाराचे इतर प्रकार
    • त्यास प्रमाणित करणे
    • समस्येचे वास्तविक स्वरूप बऱ्याच वेळा लपविलेले असते

    कोविड-19 महामारीचा प्रभाव

    या दिवशी महिलांसह पुरुषांनाही महिलांच्या हक्कांची जाणीव करून दिली जाते. गेल्या दोन वर्षांपासून कोविड-19 महामारीशी झुंज देत असलेल्या जगात, लोकांना अनेक प्रकारच्या मानसिक तणावाचा सामना करावा लागला आहे. अशा स्थितीत महिलांवरील घरगुती हिंसाचारात वाढ होणे आश्चर्यकारक नाही.

    यावेळची थीम काय आहे?

    सन 2021 मध्ये, संयुक्त राष्ट्रांनी आपली थीम “ऑरेंज द वर्ल्ड: अँड व्हायोलन्स अगेन्स्ट वुमन नाऊ” घोषित केली आहे. महिलांवरील अत्याचार आता थांबायला हवे, असे आवाहन यात करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांनी देखील हे मान्य केले आहे की कोविड महामारीमुळे महिला आणि मुलींवरील हिंसाचारात झपाट्याने वाढ झाली आहे, विशेषत: घरगुती हिंसाचार, ज्यासाठी जग तयार नव्हते.

    हा हिंसाचार झपाट्याने वाढला आहे

    13 देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणावर आधारित संयुक्त राष्ट्राच्या एका नवीन अहवालात असे आढळून आले आहे की कोविड-19 ने घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेची भावना नष्ट केली आहे, ज्याचा त्यांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे. यामध्ये जागतिक हिंसक संघर्ष, मानवतावादी समस्या आणि वाढत्या हवामान-संबंधित आपत्तींनीही महिलांवरील हिंसाचार तीव्र करण्याचे काम केले आहे.

    कौटुंबिक हिंसाचार हा महिलांच्या हक्कांचा प्रमुख मुद्दा

    महिलांच्या हक्कांसाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. मात्र, आजही अनेक देशांत त्यांना ते अधिकार मिळालेले नाहीत, ज्यावरुन ते म्हणू शकतात की आपण निरोगी समाजात जगत आहोत. तरीही कौटुंबिक हिंसाचार हा एक वेगळा मुद्दा म्हणून उदयास आला आहे. यामुळे ही समस्या सामाजिक तसेच कौटुंबिक मूल्ये, शिक्षण आणि मानसिक आरोग्याशी खोलवर संबंधित आहे.

    आणि मुलींवरील हिंसाचार थांबवणे शक्य आहे, पण..

    या समस्येतून सुटका होणे अजिबात अशक्य नाही, असे संयुक्त राष्ट्रांचे मत आहे. महिला आणि मुलींवरील हिंसाचार थांबवणे शक्य आहे. यासाठी सर्वसमावेशक काम करावे लागेल जेणेकरून अशा समस्यांचे मूळ शोधून काढणे, विघातक प्रथा बदलणे आणि उरलेल्या महिलांना अत्यावश्यक सेवा पुरवणे यासाठी मदत होईल.

    25 नोव्हेंबरच का?

    25 नोव्हेंबर या तारखेला ऐतिहासिक महत्व आहे. 25 नोव्हेंबर 1960 साली डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये तीन मीराबेल बहिणींची हत्या करण्यात आली होती. या राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्येचे आदेश डॉमिनिकन हुकूमशहा राफेल ट्रुजिलो यांनी दिले होते. 1981 च्या लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन महिलांच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी 25 नोव्हेंबर हा दिवस जागरुकता पसरवण्यासाठी आणि महिलांवरील हिंसाचाराचा सामना करण्यासाठी पाळण्याचा निर्णय घेतला, जो नंतर संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाद्वारे स्वीकारला गेला.

    दरवर्षी या विशेष दिवसाला 16 दिवसांच्या विशेष सक्रियतेची सुरुवात म्हणून पाहिले जाते जे 10 डिसेंबर रोजी जागतिक मानवाधिकार दिनापर्यंत चालते. या 16 दिवसांमध्ये युनायटेड नेशन्स या वर्षीची थीम ‘युनायटेड टू अँड द व्हायोलन्स अगेन्स्ट वुमन’ मोहीम राबविण्यात येणार आहे. युनायटेड नेशन्सचे म्हणणे आहे की हिंसाचाराचा अनुभव घेतलेल्या 40 टक्के पेक्षा कमी महिला आणि मुली कोणत्या ना कोणत्या प्रकारची मदत घेतात. या अर्थाने हा दिवस अधिक समर्पक ठरतो.

    बेक मँगो योगर्ट आणि बनाना वॉलनट केक | Bake Mango Yogurt & Banana Walnut cake |Epi 40|Shankhnaad News

        शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा