महिला शहरप्रमुखांवरील हल्ला प्रकरणाला गंभीर वळण
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अटकेत

0


वाशिम. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांच्या गटाच्या वाशिम (Washim ) महिला शहर प्रमुख रंजना पौळकर (Ranjana Paulkar) यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाला गंभीर वळण येताना दिसत आहे. वाशिम पोलिसांनी रंजना पौळकर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी ठाकरे गटाचेच जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद बांधकाम सभापती सुरेश मापारी (Thackeray group’s district head Suresh Mapari) यांना अटक केली आहे. ठाकरे गटाच्या महिला शहरप्रमुखावरील हल्ल्याप्रकरणी जिल्हाप्रमुखाला अटक करण्यात आल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. घटनेमागील नेमके कारण मात्र अद्याप समोर आले नाही. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या घटनाक्रमाकडे लागले आहे. एकीकडे ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचे आउटगोईंग सुरू आहे. त्यामुळे चिंता वाढली असतानाच पक्षांतर्गत वादही समोर येत असल्याने ठाकरे गटापुढील आव्हाने वाढतच आहेत.


उद्धव ठाकरे गटाच्या वाशिम मधील महिला शहर प्रमुख रंजना पौळकर या १० नोव्हेंबरला भरदिवसा मैत्रिणीसोबत बाजारात गेल्या होत्या. बेसावध क्षणी यांच्यावर अज्ञातांकडून चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. पौळकर यांच्यावर दहा ते पंधरा वेळा चाकूने वार करण्यात आले होते. त्यांना तात्काळ वाशिम रुग्णालयात भरती करण्यात आले. या घटनेमुळे वाशिम जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. वेगवेगळे तर्त –वितर्क लावले जात होते.

दरम्यान, पोलिसांनी या हल्ल्याची गंभीर दखल घेतली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठत संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली होती. तसेच वाशिम शहर पोलिस ठाण्यात कलम 307 आणि अॅट्रोसिटीच्या कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या सहावर गेली आहे. पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. वाशिम पोलिसांनी या प्रकरणात सुरेश मापारी यांना अटक केल्याने साऱ्यांनाच धक्क बसला आहे. या घटनेमागे राजकीय कारण की अन्य काही कारण आहे, ते अद्याप समोर आले नाही. पोलिसांकडून बारकाईने संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे. रंजना पौळकर यांनी याआधीच जिल्हाप्रमुख सुरेश मापरी यांच्या निकवर्तीयांकडून त्यांच्या जिवाला धोका असल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र, त्यावेळी पोलिसांनी अदखलपात्र तक्रार नोंदवून पौळकर यांची बोळवण केली.

आलू पराठा आणि कटलेट्स रेसिपी ट्रान्सजेंडर मोहिनी सोबत शंखनाद कीचनमध्ये | Epi 39| Aloo Paratha Recipe