माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

0

सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव


चंद्रपूर / दिल्ली. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि भाजप ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर (Former Union Minister of State for Home Affairs and National Vice President of BJP OBC Morcha Hansraj Ahir) यांची मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती (Appointment as Chairman of Backward Classes Commission) करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Daupadi Murmu ) यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. राजकीय कारकिर्दीत हंसराज अहीर यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे ४ वेळा प्रतिनिधीत्व केले असून संसदीय कारकिर्दीत त्यांनी समाजकारणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या समित्यांवर काम केले आहे. हंसराज अहीर यांनी प्रभावी संघटनात्मक कार्यातून समाजवादाला राजकारणाशी जोडून ओबीसी, भटक्या, अल्पसंख्याक समाजातील मोठ्या वर्गाला भाजपशी जोडण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. आपल्या दैदिप्यमान संसदीय कार्यातून त्यांनी गरीब, शोषित, कष्टकरी, शेतकरी, कष्टकरी आणि इतर समूहांच्या सामाजिक उन्नतीसाठी विशेष प्रयत्न करून न्याय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. भाजप ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर अतिशय प्रभावीपणे काम करत त्यांनी मागासवर्गीय समाजाच्या विकासाला महत्त्व देतानाच संघटना वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.


राजकीय व सामाजिक कार्य आणि प्रत्येक जबाबदारीला न्याय देण्याचे व्यापक अनुभव व क्षमता असलेले हे नेतृत्व पाहता, त्यांच्याकडे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हंसराज अहीर यांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. या निवडीबाबत हंसराज अहीर यांनी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत. केंद्रीय नेतृत्वाने सोपवलेल्या या जबाबदारीला न्याय देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशाच्या राजकारणातीही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. कोळसा विषयावर त्यांचा दांडगा अभ्यास आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणींमधील अवैध उत्खननाला आळा घालण्यासोबतच योग्य शिस्त लावण्याचे श्रेय त्यांनाच जाते. चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्याचेही कार्य त्यांनी आपल्या कार्यकाळात केले.

बेक मँगो योगर्ट आणि बनाना वॉलनट केक | Bake Mango Yogurt & Banana Walnut cake |Epi 40|Shankhnaad News

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा