मौदा महामार्गावर भीषण अपघात चिमुकलीसह मातेचा मृत्यू दोन गंभीर जखमी

0

नागपूर : नागपूर ते भंडारा महामार्गावर मौदा येथे आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात तीन वर्षाच्या चिमुकलीसह मातेचा जागीच मृत्यू झाला. वडील आणि त्यांची म्हातारी आई जखमी आहेत. ट्रक ट्रेलर ने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत मायलेकीचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावर रक्त-मांसाचा सडा पडलेले हे दृश्य विदारक असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. पोलिसांनी मृतदेह आणि जखमींना तातडीने मेयो रुग्णालयाकडे रवाना करीत मार्ग मोकळा केला. हे वाघमारे कुटुंबीय दुचाकीने कुहीच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. मौदा येथे रबडी वाला टी पॉईंट परिसरात हा भीषण अपघात घडला. प्रांजल राजहंस वाघमारे (22 ),पार्थवी वाघमारे(३) अशी मृत्युमुखी पडलेल्या मायलेकीची नावे आहेत. दरम्यान राजहंस वाघमारे व अंजना किसन वाघमारे या मायलेकाना गंभीर जखमी अवस्थेत मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मौदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीचा क्रमांक एमएच40c 29 26 असा असून मायलेकीचा मृत्यूस कारणीभूत ठरलेला ट्रेलरचा क्रमांक सीजी 2436 असा आहे. सायंकाळपर्यंत ट्रकचालकाला अटक करण्यात आलेली नव्हती.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा