यशवंतराव चव्हाण एक जाणते बहुआयामी व्यक्तिमत्त्व – पुण्यतिथीदिनी मान्यवरांची आदरांजली

0

नागपूर : “मृत्यू अटळ आहे. माणसे येतात आणि जातात. परंतु काही माणसे आपल्या कर्तृत्वाने अमर होतात. कीर्ती आणि कर्तृत्व या दोन गोष्टींनी कर्तृत्ववान पुरुषाला कीर्ती प्राप्त होतेच असे नाही. तसेच कीर्तीप्राप्त पुरुष कर्तृत्ववान असतातच असेही नाही. परंतु आपल्या कर्तृत्वाने अमर झालेल्या आणि कर्तृत्वाने कीर्ती प्राप्त केलेल्या भाग्यवान मंडळींमध्ये स्व. यशवंतराव चव्हाण यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल” असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस दिलीप पनकुले यांनी केले.


स्व. यशवंतराव चव्हाण हे तळागळातील कार्यकर्त्यांचे कैवारी होते. त्याचप्रमाणे दुर्बल घटकांवर लक्ष ठेवणारे, शेतीविषयक धोरणाबाबत पुरोगामी दृष्टिकोन ठेवणारे नेते होते” असे मत स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज अजनी चौक, वर्धा रोड, नागपूर येथे आयोजिलेल्या कार्यक्रमात माजी आमदार दीनानाथ पडोळे यांनी व्यक्त केले, बजरंगसिंह परिहार यांनी देखील विचार मांडले. या प्रसंगी आयोजक दिलीप पनकुले, तात्यासाहेब मते, सुशील अरसपुरे, नरेश सिरमवार, दुष्यंत गाटकिने, बबलू चौहान, मंदार हर्ष, सोपानराव शिरसाट, भाईजी मोहोड,,विजय मसराम, राजेश टेंभुर्णे, मच्छिंद्र आवळे प्रशांत लांडगे प्रमोद जोंधळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बेक मँगो योगर्ट आणि बनाना वॉलनट केक | Bake Mango Yogurt & Banana Walnut cake |Epi 40|Shankhnaad News