मुंबई : योग गुरु बाबा रामदेव हे सध्या नव्या वादात अडकले आहेत. त्यापायी त्यांच्यावर टीका होत आहे. (Baba Ramdev controversial statement) रामदेवबाबा यांनी महिलांबद्धल केलेले एक वक्तव्य वादग्रस्त ठरत आहे. एका योग विज्ञान शिबीरात त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. योगगुरु रामदेवबाबा म्हणाले की, “महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटतात. महिला सलवार सुटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने काही नाही घातले, तरी चांगल्या दिसतात” असे रामदेव बाबा म्हणाले. या शिबीरात महिलांना योगासाठी ड्रेस आणले होते व त्यानंतर आयोजित महिला महासंमेलनासाठी साड्या आणल्या होत्या. मात्र, महिलांना साड्या नेसायला वेळ न मिळाल्याने रामदेवबाबा यांनी त्यावर भाष्य करताना हे वादग्रस्त विधान केले.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या नेत्या विद्या चव्हाण यांनी योगगुरु रामदेवबाबा यांच्यावर टीका केली आहे. हे अतिशय धक्कदायक विधान असून भगवी वस्त्रे परिधान करणाऱ्या बाबांना हे शोभत नाही, असे त्या म्हणाल्या. सिनेमातील हिरोईन्स याच्याकडे योगासने शिकतात. बाबा अशा प्रकारे महिलांबाबत बोलतात. हा सन्यासी आहे तर बायकांकडे बघता कशाला? असेही त्या म्हणाल्या. अनेक पुरुषांची महिलांबाबत वादग्रस्त विधाने मी ऐकली आहेत. पण असे खालच्या पातळीवरच विधान कुणीही केले नव्हते. तेही एका सन्याशी माणसाने अशा प्रकारचे विधान केलेले मी ऐकले नव्हते. कारण असे विधान अत्यंत चीड आणणारे, संताप आणणार आहे. हा प्रकार म्हणजे बाबा रामदेवची जीभ घसरलेली नाही, त्याची नजर वाईट आहे. त्याचा बायकांकडे बघण्याचा दृष्टीकोन वाईट आहे, असे त्या म्हणाल्या.
*बेक मँगो योगर्ट आणि बनाना वॉलनट केक | Bake Mango Yogurt & Banana Walnut cake |Epi 40|Shankhnaad News*