नवी दिल्ली : देशाला हादरवणाऱ्या दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी (Shraddha Murder Case Accused Aftab Poonawala) प्रकरणातील नराधम आरोपी आफताब पुनावाला याने न्यायालयापुढे श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली आहे. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचे आफताबने न्यायालयात सांगितले. आफताबच्या पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आरोपी आफताबची पोलीस कोठडी आज संपल्यामुळे त्याला दिल्लीच्या साकेत न्यायालयात हजर करण्यात आले होते. “श्रद्धाची हत्या मीच केली व ती घटना रागाच्या भरात क्षणार्धात घडली. आपण तपासात सहकार्य करीत आहोत” असे आफताबने न्यायालयात सांगितले. हत्येचा घटनाक्रम आपल्याला नीट आठवत असल्याचा दावाही तो सातत्याने करीत आहोत.
दिशाभूल सुरुच
दिल्ली पोलिसांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा हत्याकांड प्रकरणात आफताब एखाद्या प्रोफेशनल किलरप्रमाणे पोलिसांची दिशाभूल करतो आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी त्याने तीन करवतीच्या ब्लेडचा वापर केला व त्यानंतर त्या ब्लेड डीएलएफ, गुरुग्राम येथील त्याच्या कार्यालयाजवळ फेकून दिल्यचे तो सांगतो. मात्र, सलग दोन दिवस ब्लेडचा शोध घेऊनही पोलिसांना त्या सापडलेल्या नाहीत. आता पोलिस या आठवड्यात आणखी एकदा शोधमोहीम राबवतील, असे सांगितले जात आहे. यापूर्वी त्याने वापरलेली शस्त्रे जंगलात फेकल्याचा दावा केला होता.
शीर सापडले नाही
श्रद्धाचे शीर पोलिसांना अद्यापही सापडलेले नाही. तपासाच्या दृष्टीने ते सापडणे अत्यंत आवश्यक असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत आफताबला विचारले असता तो सातत्याने जबाब बदलत असल्याचे निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदविले असून याची माहिती न्यायालयास देण्यात आली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिस पुन्हा एकदा जंगल परिसरात शोधकार्य राबवू शकता, असे सूत्रांचे म्हणणे असून शस्त्रांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल 14 पथके तयार केल्याचे सांगण्यात आले.
रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याची आफताबची न्यायालयात कबुली
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा