राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा वाद, सचिन पायलट ‘गद्दार’ असल्याची गेहलोत यांची टीका

0

जयपूर : राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा वादळ निर्माण होण्याची संकेत मिळत आहेत. काँग्रेसच्या पायलट व गहलोत गटांमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांचा ‘गद्दार’ असा उल्लेख केला आहे. “सचिन पायलट हे गद्दार आहेत (Tussle between Rajasthan CM Gehlot And Sachin Pilot ). मुख्यमंत्री म्हणून माझ्या जागी त्यांना मुख्यमंत्री केलं जाऊ शकत नाही,” असे वक्तव्य अशोक गेहलोत यांनी केले आहे. अशोक गेहलोत यांच्या टीकेला सचिन पायलट यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. गहलोत यांचे आरोप निराधार असल्याची प्रतिक्रिया पायलट यांनी व्यक्त केली आहे. मात्र, आता या दोन गटांमधील संघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो, असे संकेत या घटनाक्रमामुळे निर्माण झाले आहेत.


एकिकडे राहुल गांधी भारत जोडो यात्रेत व्यस्त असताना राजस्थान कांग्रेसंमध्ये पुन्हा एकदा वादळ निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. गहलोत म्हणाले की, पायलट यांनी २०२०मध्ये बंडखोरी केली होती. इतकेच नव्हे तर आपल्याच पक्षाचे सरकार पाडण्याचाही प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री बनवले जाऊ शकत नाही. पायलट यांच्या बंडामागे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात होता, असा आरोपही गेहलोत यांनी केला आहे. पायलट यांच्यासह बंडखोर आमदारांना दहा कोटी रुपये देण्यात आले होते व त्याचे पुरावेही माझ्याकडे आहेत, असाही गहलोत यांचा दावा आहे. मात्र, गहलोत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सचिन पायलट यांनी संयम बाळगला आहे. काँग्रेस पक्षाला मजबूत करणे याकडे लक्ष देणे जास्त गरजेचे असल्याचे आवाहन त्यांनी केले आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा यशस्वी कशी होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण सध्या देशाला याची गरज आहे, असे मतही पायलट यांनी व्यक्त केले आहे. “सध्याच्या स्थितीत त्यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने अशा मुद्द्यांवर बोलणे शोभत नाही,” अशी असेही पायलट यानी नमूद केले आहे.

बेक मँगो योगर्ट आणि बनाना वॉलनट केक | Bake Mango Yogurt & Banana Walnut cake |Epi 40|Shankhnaad News

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा