नवी दिल्लीः राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणात (Rajiv Gandhi assassination case) जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व सहा आरोपींना मुक्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेत. सध्या कारागृहात असलेल्या या सहा आरोपींवर अन्य कोणताही गुन्हा नसल्यास त्यांची मुक्तता करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्या. भूषण गवई यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नलिनी, रविचंद्रन, मुरुगन, संथन, जयकुमार आणि रॉबर्ट पॉयस या सर्व सहा जणांची सुटका होणार आहे. तर यातील सहावा आरोपी पेरारिवलन याची याआधीच सुटका करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने १८मे रोजीच चांगल्या वर्तवणुक असल्याचे नमूद करत पेरारिवलनची सुटका केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे की, राज्यपालांनी यावर काहीच ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे आम्ही निर्णय देत आहोत. न्यायालयाने या प्रकरणातील दोषी पेरारिवलनची मुक्तता करताना दिलेला आदेश सर्व आरोपींसाठीही लागू होईल
३१ वर्षांपूर्वी हत्या
२१ मे १९९१ रोजी तामीळनाडूतील श्रीपेरुम्बदूर येथे निवडणुकींच्या प्रचारसभेच्या दरम्यान आत्मघाती हल्ला करून राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पेरारिवलनसह ७ जणांना आरोपी म्हणून दोषी ठरवण्यात आले होते. टाडा कोर्टाने आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दयेचा अर्ज स्वीकारत त्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत परिवर्तीत केली होती. 30 वर्षांहून अधिक काळ हे आरोपी कारागृहात आहेत. या प्रकरणातील नलिनी हिने सुटकेची मागणी करीत न्यायालयात धाव घेतली होती.
राजीव गांधी हत्या प्रकरणातील सहा आरोपींना मुक्त करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा