राज्यपालांचे समर्थन करण्याची भूमिका कोणाचीच नाही-चंद्रशेखर बावनकुळे

0

नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यपाल वादावर भाष्य केले आहे. राज्यपालांचे पद हे घटनात्मक पद असून त्यांना ठेवायचे की नाही, याचा अधिकार आम्हाला नाही. ज्यांना याबाबत अधिकार आहेत, तेच निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. (Bawankule on Governor) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्धल केलेल्या वक्तव्यावरून वातावरण तापलेले असताना त्यांच्या राजीनाम्याची तसेच हकालपट्टीची मागणी विरोधकांकडून सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी पक्षाची भूमिका पुन्हा एका स्पष्ट केली आहे. राज्यपालांचे समर्थन करणारी कोणाचीच भूमिका नाही, हे स्पष्ट करताना त्यांना ठेवायचे की नाही, हे ठरविण्याचा अधिकार आम्हाला नसल्याचे त्यांनी सांगितले.


बावनकुळे म्हणाले, खासदार उदयनराजे असोत किंवा आम्ही, आमच्यापैकी कोणाचीही भूमिका राज्यपालांचे समर्थन करणारी नाही. मात्र, हे घटनात्मक पद आहे. त्यांना ठेवायचे की नाही हा आमचा अधिकार नाही. त्यादिवशी राज्यपालांची चूक झाली आहे. त्यामुळे त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल. दरम्यान, वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणात आदित्य ठाकरे खोटे बोलत असल्याची टीका बावनकुळे यांनी केली. मागील सरकारने वेदांतला कुठलीही जागा दिलेली नाही व कुठलीही बैठक घेतलेली नाही, अशी माहिती आरटीआयमधून पुढे आली आहे. वेदांता प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे गेला, असे ते म्हणाले. पीक विमा मुद्यावरही बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. महाविकास आघाडी सरकारने विमा कंपन्यांना पैसे दिले. मात्र, अडीच वर्षे कधीही आढावा घेतला नाही. खरिपाच्या आढावा बैठका सुद्धा त्या काळात झाल्या नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण नव्हते. आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांच्या प्रकरणात जो भ्रष्टाचार झाला आहे, त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.

Shankhnaad News | epesoid 44 रवा खवा करंजी आणि भरली वांगी