नागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा काल भाषणात एकेरी उल्लेख केला. त्याचप्रमाणे महाराजांची तुलना देखील चुकीच्या पद्धतीने केली, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे देव आहेत,त्यांचे रक्त आमच्या नसानसात भिनलेले आहे त्यामुळे त्यांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही या शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज राज्यपालांचा निषेध केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपुर जिल्ह्याचे वतीने जिल्हा अध्यक्ष आदित्य दुरुगकर यांच्या नेतृत्वात हिंगणा येथील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भव्य निषेध आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी हे वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून महापुरुषांचा अपमान करीत आहेत
त्यांचे वय झाले आहे म्हणून त्यांना केंद्र सरकारने परत बोलवावे, अशी मागणी देखील यावेळी नारेबाजीसह करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने दीपक नासरे माजी तालुका अध्यक्ष , सचिन चिटकुले माजी जिल्हा उपाध्यक्ष नागपुर, अनिल पारखी माजी तालुका अध्यक्ष नागपुर ग्रामीण , दिपक ठाकरे माजी तालुका संघटक ,रिषीराज चौकसे, खेमेन्द्र पारधी माजी तालुका संघटक हिगंणा, नंदु पोटे माजी तालुका सचिव, शुभम कळबे, वैभव मुळे , यश ठाकरे , रितीक डाहे , रोशन पाटील, राजेश कावळे, अकीतं गोडंणे, अविनाश फटकळ , राजेश कावळे, अफसाणा पठाण , सरीता महाजण, लता जाधव अनिल माहुरे , विठ्ठल नगराळे, योगेश टोगें,लोकेश पटले , मयुर मेश्राम, नितेश लाजेवार, अश्विन पटले, महेश पटले,भारत रहिले, पियुष शेलके, मनोज ठाकरे, उमेश पाटील,सौरभ बारके, माधव राणे , दिगेश्वर बिसेन, व मोठ्याप्रमाणात मनसैनिक उपस्थित होते.