राज्यपाल कोश्यारी, भाजप प्रवक्ते त्रिवेदींची पाठराखण करु नकाः संभाजीराजे छत्रपती

0

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati on Governor koshari) यांनी नाराजी व्यक्त केली असून फडणवीस त्यांची पाठराखण का करीत आहेत?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे फडणवीस म्हणाले होते. त्याचप्रमाणे भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली, असे वक्तव्य केलेच नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. त्यावर संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला असून दोघांची पाठराखण करण्यापेक्षा त्यांना माफी मागायला लावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत जे काही वक्तव्य केले आहे, त्याचे समर्थन करणे, राज्यपालांना पाठीशी घालणे योग्य नाही. देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आहे. तरीही ते राज्यपालांना पाठीशी का घालत आहेत हा मलाही पडलेला प्रश्न आहे. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी चॅनेलवर शिवाजी महाराजांबाबत जे वादग्रस्त वक्तव्य केले आहे, त्याबाबत माफी मागितलीच पाहिजे. मी देवेंद्र फडणवीसांना भेटेल तेव्हा तुम्ही या दोघांची पाठराखण का करीत आहात?, असा प्रश्न त्यांना विचारणार असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले. मुंबईतील एका कार्यक्रमात फडणवीस यांनी जगात चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत महाराष्ट्राचे आणि देशातील सगळ्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हेच राहणार असल्याचे व्यक्तव्य केले आहे. आजच्या भाषेत बोलायचे तर आमचे आजचे हीरो हे शिवाजी महाराज हेच आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा