रामदेव बाबा विरोधात संताप सुरूच, मनसेने फेकली फलकावर शाई

0

नागपूर : ठाणे येथील, योग शिबिरामध्ये योगगुरू रामदेव बाबांनी महिलांबाबत बेताल व्यक्तव्य केले. वाढता विरोध लक्षात घेता अखेर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी संताप कायम आहे . नागपुरात आज पतंजली स्टोअर्ससमोर मनसे शहर आणि महिला आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष विशाल बडगे व चंदू लाडे यांच्यासह महिला सेनेच्या मनीषा पापडकर यांच्या नेतृत्वात सक्करदरा परिसरात हे आंदोलन करण्यात आले. बाबा रामदेव यांच्या विरोधात मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत लक्ष वेधले.


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा वाद सुरू असतानाच आता बाबा रामदेव यांनी हे वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य करीत लोकांची, विरोधकांची नाराजी ओढवून घेतली आहे. महिला साडी, सलवार सूटमध्ये तर चांगल्या दिसतातच. पण काही नाही घातले तरी त्या छान दिसतात, असे आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केले.
आज दुपारी सक्करदरा पोलीस स्टेशनच्या बाजूला पतंजली स्टोअरच्या समोर हे आंदोलन करण्यात आले. बाबा रामदेव यांच्या विरोधात नारेबाजी करताना मनसैनिक आक्रमक झाले होते. काहींनी बाबा रामदेव यांच्या बॅनरवर शाई फेकण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, आपल्या विरोधात तक्रारी आल्या आहेत, याबाबत आपण तीन दिवसांत स्पष्टीकरण द्यावे, असे महिला आयोगाने बाबा रामदेव यांना पाठवलेल्या नोटिसमध्ये म्हटले आहे. बाबा रामदेव यांनी महिलांबाबत केलेल्या या विधानाची गंभीर दखल आयोगाने घेतली आहे हे विशेष.

मनसेच्या या आंदोलनात शहराध्यक्ष विशाल भाऊ बडगे व चंदू भाऊ लाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती शहर सचिव घनश्याम निखाडे , विभाग अध्यक्ष अंकित झाडे, उमेश उत्तखेडे, प्रशांत निकम, तुषार गिऱ्हे, , महिला सेनेच्या अर्चना कडू , मनीषा पऱ्हाड, मंजुषा पानबुडे, पुनम चाडगे, मीनल शितोळे, रचना गजभिये, कल्पना चव्हाण, सुनिता कैथल, सुनिता बोडके, स्नेहा खोब्रागडे, श्वेता कोठेकर ,माधवी गायकवाड, अर्चना सुफले, सुनिता डेहारे तसेच मनसे शहर पदाधिकारी गोकुल वरेकर, पंकज खिची, अजय मोहाडीकर, ओमकार चन्ने, प्रज्वल देशमुख, मयुर राऊत, अक्षय बिलवणे, अजय मोराडे, अतुल कोरे, ललित तांडे, लखन चोरमार, राजेश भिसे, सुनील हरीणखेडे, चेतन बोरकुटे, चेतन शिराळकर व मोठ्या संख्येत महाराष्ट्र सैनिक सहभागी झाले.