स्वतंत्र्यवीर सावकरकरांविरोधात वादग्रस्त विधानाचे पडसाद
नागपूर. स्वातंत्र्यवीर सावरकर (V. D. Savarkar) यांच्या विरोधात काँग्रेस नेते राहूल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. राहुल गांधी व काँग्रेसविरोधात (Congress) सर्वत्र आंदोलन सुरू आहे. नागपुरातही (Nagpur) गुरुवारी आंदोलन करण्यात आले त्यांनंतर आज काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपा आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. तसेच या दोघांवर गुन्हा दाखल करुन त्यांनी अटक करण्याची मागणीही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. आमदार कृष्णा खोपडे आणि आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात शुक्रवारी भाजपा कार्यकर्त्यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
राहुल गांधी आणि नाना पटोले यांच्या विरोधात सावरकर सारख्या महापुरुषाचा अपमान होईल आणि समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली. पुढील सात दिवसात जर पोलिसांनी या संदर्भात कारवाई केली नाही. तर आम्ही राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी न्यायालयाचे दार ठोठावू असा इशाराही भाजपने यावेळी दिला. यावेळी अर्चना डेहनकर. शिवानी दाणी. धर्मपाल मेश्राम.चंदन गोस्वामी आदी भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
राहुल गांधी यांनी केलेल्या विधानानंतर भाजप, मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेसची शेगावात होणारी सभ उधळून लावण्याचा इशारा मनसेने दिला आहे. तिकडे राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असेपर्यंत पोलिसांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तिकडे राहुल गांधी यांच्या सावरकरांसंबंधिच्या वादग्रस्त विधानानंतर शिवसेना ठाकरे गटाची चांगलीच गोची झाली आहे.