रुग्णाच्या पोटात आढळली 187 नाणी, डॉक्टरही झाले अवाक्

0

बंगळुरुः कर्नाटकमध्ये एका रुग्णाच्या पोटात चक्क नाणी आढळून आली आहेत. एक दोन नव्हे तर चक्क 187 नाणी या रुग्णाच्या पोटात आढळून ( coins found in man’s stomach in Karnataka) आल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टरही चक्रावून गेलेत. कर्नाटकमधील बागलकोट जिल्ह्यात हा प्रकार उघडकीस आला. ५८ वर्षीय दयामाप्पा हरिजन या रुग्णालया पोटफुगी, पोटदुखी आणि सतत उलट्यांचा त्रास होता. त्यामुळे त्याला स्थानिक कुमारेश्वर रुग्णालयात दाखल करून तपासण्या करण्यात आल्या. एक्स-रे आणि एन्डोस्कोपीत त्याच्या पोटात नाणी आढळून आली. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन सर्व नाणी बाहेर काढण्यात आली. हा रुग्ण मानसिक रुग्ण असून त्याने मागील तीन-चार महिन्यात मोठ्या प्रमाणात नाणी गिळणे सुरु केले होते, अशी माहिती आहे.


डॉक्टरांनी दिले्लया माहितीनुसार त्या रुग्णाच्या पोटात आढळून आलेल्या नाण्यांमध्ये 56 नाणी 5 रुपयांची, 51 नाणी 2 रुपयांची तर 1 रुपयाची 80 नाणी आढळून आली होती.नाणी गिळल्याचे त्याने कोणालाही सांगितले नव्हते. मात्र, काही दिवसांतच पोट फुगून त्याला वेदना होऊ लागल्या. सतत उलट्या सुरु झाल्याने त्याला रुग्णालयात आणले गेले. त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्याची मानसिक स्थिती चांगली नाही. मात्र, तो आपले दैनंदिन काम व्यवस्थित पार पाडतो. त्याच्या पोटात एवढ्या मोठ्या संख्येने नाणी असल्याचा संशय आम्हाला आला नाही. दरम्यान, हे प्रकरण बरेच आव्हानात्मक होते, असे त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर ईश्वर कलबुर्गी यांनी सांगितले

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा