लम्पीमुळे मृत्यू झालेल्या गाईची तेरवी

0

शेतकरी कुटुंबाचा जिव्हाळा : संपूर्ण गावाला जेवण
अकोला. भारतीय संस्कृतीमध्ये गाईला मातेचे स्थान आहे. यामुळे तिचा कायमच सन्मान केला जातो. अशाच एका गोपालकाने आपल्या गाईच्या अनपेक्षित मृत्यूनंतर तिला घरातील कुटुंबासारखाच निरोप (After the unexpected death of the cow, she was given the same farewell as the family member दिला व तिच्या स्मरणार्थ तेरवीची कार्यक्रमही केला. मुख्य म्हणजे संपूर्ण गावाला तेरव्याचे जेवण खाऊ घातले. या शेतकऱ्यांच्या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या या घटनेची सध्या जिल्हाभर चर्चा (This incident of farmers’ emotional tribute is currently being discussed throughout the district) सुरू आहे. लम्पी चर्मरोगामुळे राज्यात हजारो जनावरे दगावली आहेत. अनेक वर्ष पालन-पोषण करून संगोपन केलेले जनावर आजाराने ग्रस्त झाल्यानंतर काही दिवसातच दम तोडत आहेत. आजारामुळे शेतकरी वर्ग हळहळला आहे. आपल्या जनावरांवर आलेल्या संकटाने चिंतीत आहे. संकटाच्या या घडीत पशुपालक आपल्या गुरांना माया लावत आहेत. उपचारापासून सुश्रृषाही करीत आहे. घरातल्या सदस्याची काळजी घ्यावी तशी जनावरांनाही माया लावत आहे.
आगर येथून जवळच असलेल्या खेकडी येथील शेतकरी सारंगधर गुणवंत काकड यांच्या गाईला लम्पीची लागण झाली. त्यांनी गाईवर उपचार केले. मात्र, व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक होता. त्यामुळे २७ ऑक्टोबर रोजी आजारातच गाईचा मृत्यू झाला. आपल्या लाडक्या गाईच्या मृत्यूमुळे काकड कुटुंबाला मोठे दु:ख झाले. त्यांनी गाईला अत्यंत भावपूर्ण निरोप दिला. घरातील सदस्याप्रमाणे गायीलाही साडी-चोळी, हार, फुलांसह गाईला पुरवले. गायीच्या अंत्ययातेवेळी मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते. शोकाकूल वातावरणात गायीला अंतीम निरोप दिला गेला. जड अंतकरणाणे कुटुंबीय घरी परतले.
लागलीच कुटुंबाने गाईची तेरवी करण्याचे ठरवले. त्यानुसार गुरुवारी, १० नोव्हेंबर रोजी तेरवीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी अवघ्या गावातील लोकांना निमंत्रण देण्यात आले. २०० लोकवस्तीचे हे गाव आहे. समारंभात मोठ्या संख्येत गावकऱ्यांनी सहभाग घेतला.
काकड यांनी गायीच्या आठवणींना वाट मोकळी करून दिली. २० वर्षांपासून ही गाय कुटुंबाच्या एक सदस्याप्रमाणे होती. कुटुंबातील सर्व सदस्यांचा गाईशी जिव्हाळा होता. त्यामुळे तिचा मृत्यू सर्वांसाठी धक्कादायक ठरला. तिच्या स्मरणात तेरवी करून गावातील सर्वांना निमंत्रण देऊन जेवण दिले. या वेळी सर्व निमंत्रित उपस्थित होते. गाय जीवंत नसली तरी ती सदैव आमच्या स्मरणात राहील अशी भावना त्यांनी व्यक्त केली.